Viral Video: तुफान वाऱ्यामुळे उडाला टकल्या व्यक्तीचा विग, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हास्याचा पडतोय पाऊस
Viral Video (Photo Credits-YouTube)

Viral Video: एका टकलू माणसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो वादळामुळे त्याचा विग उडाल्याने तो पकडण्यासाठी त्याच्यामागे धावताना तो दिसत आहे. शुक्रवारी सकाळी डेव्हॉनचे रहिवासी सायमन विल्क्स कार पार्कमध्ये उभे असताना हा मजेदार क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर, बार्नस्टॅपलमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याचा विग  डोक्यावरून उडून गेला. त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेने तो माणूस हैराण होत त्याच्या विगच्या मागे धावताना दिसला.

व्हिडिओ शूट करणारा त्याचा मित्र जेमी बॅग्राउंडमध्ये हसताना आणि असे म्हणताना ऐकू येतो. "अरे, त्याचा पाठलाग करायचा आहे." हा व्हिडिओ व्हायरल झाला  असून लोक आता लोटपोट होत आहेत. पाहून लोक हसत आहेत. एका युजरने  अशी प्रतिक्रिया दिली की, "त्याच्यासाठी आकाशवाणीपेक्षा केस अधिक महत्त्वाचे आहेत.''(Viral Video: आकाशातून अचानक पडला हजारो पक्ष्यांचा थवा, शेकडो पक्षांचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओ पाहून येईल अंगावर शहारा)

ब्रिटनमधील युनिस चक्रीवादळामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती, शेकडो शाळा बंद करण्यात आल्या होत्या आणि देशभरातील अनेक महत्वाचे पूल बंद करण्यात आले होते. दरम्यान, लाखो लोकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगण्यात आले. सिरियमच्या आकडेवारीनुसार युनाइटेड किंग्डममध्ये युनिस चक्रीवादळामुळे एकूण 436 उड्डाणे रद्द करण्यात आली.