Viral Video: आकाशातून अचानक पडला हजारो पक्ष्यांचा थवा, शेकडो पक्षांचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओ पाहून येईल अंगावर शहारा
Birds Viral Video in Mexico (PC - Twitter)

Birds Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ मेक्सिकोचा (Mexico) असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यात आकाशात उडणारा हजारो पक्ष्यांचा थवा अचानक जमिनीवर कोसळला. या घटनेत शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा पाहिला गेला असून नेटकऱ्यांनाही या घटनेचा धक्का बसला आहे. इयान माइल्स चेओंग नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सुमारे एक मिनिटाच्या या विचित्र घटनेवर विश्वास ठेवणे कठीण होत आहे.

ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून असे दिसून येते की, पिवळ्या डोक्याच्या पक्ष्यांचा थवा घर आणि रस्त्यावर अचानक येऊन पडला. पक्षी पडल्यावर क्षणभर सर्वत्र अंधार पडला, त्यावरून त्यांच्या संख्येचा सहज अंदाज लावता आला. रस्त्यावर पडलेले पक्षी मोठ्या संख्येने उडून गेले आणि शेकडो पक्षी तेथेच मेल्याचे दिसून आले. (हेही वाचा - Assam: स्वप्नातील Scooter खरेदी करण्यासाठी नाण्यांची पोती घेऊन शोरूममध्ये पोहोचली व्यक्ती; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ)

कॅमेऱ्याच्या दुसऱ्या फ्रेममध्ये रस्त्यावर मृतावस्थेत पडलेले पक्षी दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील चिहुआहुआच्या रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर लोक आपली मते मांडण्यात व्यस्त आहेत. अनेकांनी 5G नेटवर्क हे एक कारण असल्याचं सांगितले आहे.