Assam: स्वप्नातील Scooter खरेदी करण्यासाठी नाण्यांची पोती घेऊन शोरूममध्ये पोहोचली व्यक्ती; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
स्कूटर खरेदी करण्यासाठी नाण्यांची पोती घेऊन आलेली व्यक्ती (PC- Facebook)

आसाम (Assam) मधील एका व्यक्तीने स्कूटर (Scooter) खरेदी केल्याची एक रंजक कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्यक्ती नाण्यांची पोती घेऊन दुचाकीच्या शोरूममध्ये पोहोचला होता. त्याने ही नाणी साचवून ठेवली होती. ही सर्व नाणी त्याची कित्येक महिन्यांची बचत होती. ही सर्व नाणी घेऊन हा व्यक्ती स्कूटर खरेदीसाठी शोरूममध्ये पोहोचली. त्यानंतर नेमकी काय घडलं जाणून घेऊयात...

यूट्यूबर हिरक जे दास यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानुसार, व्यवसायाने दुकानदार असलेल्या या व्यक्तीला त्याच्या स्वप्नातील स्कूटर खरेदी करायची होती. त्यासाठी तो अनेक महिन्यांपासून पिगी बँकेत नाणी जमा करत होता. नुकतेच स्कूटर घेण्यासाठी पैसे जमा झाल्यावर त्यांनी शोरूम गाठले. (Stock Market: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी Roller Coaster video शेअर करत दाखवली शेअर मार्केटची अवस्था)

नाण्यांची पोती घेऊन गाठले शोरूम -

मात्र, ही व्यक्ती ज्या पद्धतीने स्कूटर खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये पोहोचली तो प्रकार खूपच रंजक होता. किंबहुना तो आपल्या बचतीतून नाण्यांची पोती भरून शोरूममध्ये पोहोचला होता. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, जेव्हा ही व्यक्ती शोरूममध्ये पोहोचते तेव्हा तेथील उपस्थित असलेले लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले. अनेक जण त्याची नाण्यांनी भरलेली जड बॅग उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

दरम्यान, शोरूमचे कर्मचारी बराच वेळ ही नाणी मोजत होते. ही व्यक्ती 1, 2 आणि 10 रुपयांची नाणी घेऊन शोरूममध्ये पोहोचली होती. पैसे भरून आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर स्कूटरच्या चाव्या शोरुममालकाने या व्यक्तीला दिल्या. याचा एक व्हिडिओही यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन लोक नाण्यांची पोती घेऊन जाताना दिसत आहेत. एका ठिकाणी नाणी प्लास्टिकच्या टोपलीत ठेवण्यात आली आहेत. युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचे नाव सांगण्यात आलेले नाही.