Stock Market: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी Roller Coaster video शेअर करत दाखवली शेअर मार्केटची अवस्था
Stock Market (Archived images)

शेअर बाजार (Stock Market) म्हणजे सगळीच अनिश्चितता. कधी रंकाचा राव आणि कधी रावाचा रंक होईल हे भल्याभल्यांनाही नाही कळत. त्यामुळे शेअर मार्केटचा बैल कधी उधळेल याची वाट बघता बघता अनेक लोक थकून जातात. तर उधळलेला बैर कधी शांत होईल आणि आपली गुंतवणूक हवेत विरवून टाकेल याच्या भीतीने अनेकजण गारठतात. दररोजचा निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशाक वर खाली होताना होणारी अवस्था उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नेमकी टीपली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अर्थात हा व्हिडिओ रोलर कोस्टरचा (Roller Coaster Video) आहे. मात्र तो पाहू खरोखरच स्टॉक मार्केटची प्रचिती येते.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर रोलर कोस्टरचा एक व्हिडिओ शेअर करत त्याची तुलना स्टॉक मार्केटशी केली आहे. आपण जर रोलर कॉस्टरचा अनुभव घेतला असेल तर आपल्याला ही अवस्था अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. जर हा अनुभव घेतला नसेल तर हा व्हिडिओ पाहूनही आपल्याला प्रचिती येऊ शकते. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, बाजारातला आणखी एक दिवस. अशक्त हृदयाच्या लोकांनी व्हिडिओ पाहून नये. (हेही वाचा, आनंद महिंद्रा यांनी पाळले वचन! दिव्यांग बिरजू राम यांना दिली कंपनीत नोकरी; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या)

ट्विट

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख लोकांपेक्ष अधिक युजर्सनी पाहिला आहे. लोकही यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक आनंद महिंद्रा यांच्याशी सहमत झाले आहेत आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर घडलेल्या प्रकारची महितीही देत आहेत. काही लोक तर रोलर कोस्टर राईडचा अनुभव अगदीच भयंकर असल्याचे सांगत आहेत.