Viral Video: परिक्षेत कॉपी करण्यासाठी डोक्यावर लावले वीग आणि कानात इअरफोन्स, असा झाला घटनेचा खुलासा
Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

Viral Video: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी काही लोक विविध जुगाड करतात. परंतु अखेर त्या जुगाडामुळे पकडले गेल्यास आपल्या अपेक्षांचा भंग होते. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशात उप-पोलीस यांच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी एका तरुणाने विचित्र शक्कल लढवली. परंतु पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आरोपीला कॉपी करताना अखेर रंगेहाथ पकडले.  या सर्व प्रकराबद्दल विचारले असता त्याने दिलेली माहिती ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. ट्विटरवर त्यांनी व्हिडिओला कॅप्शन लिहिले की, #UttarPradesh mein Sub-Inspector च्या EXAM mein  #CHEATING #nakal साठी शानदार जुगाड.(Desi Jugaad Video: फिटनेस, मजा आणि शास्त्र; देसी जुगाड पाहून तुम्ही घ्याल मजा पाहा व्हिडिओ)

Tweet:

या व्हिडिओ तरुणाने खऱ्या केसावर वीग लावला आहे. त्यामध्ये इअरफोनचे कनेक्शन सुद्धा दिले आहे. या इअर फोन कनेक्शनच्या माध्यमातून तरुणाने कॉपी केली. कानात टाकलेले इअरफोन्स ऐवढे सूक्ष्म होते की, ते दिसणे किंवा ते आहेत हे कळणेच मुश्किल होते. परंतु पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आरोपीला अखेर ताब्यात घेतले.