Desi Jugaad | (Photo Credit -Twitter)

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडचे जग. काय काय पाहयला मिळेल नाही सांगता यायचे. त्यात कलाकार आणि उपोद्व्यापी मंडळींची दुनियेला कमी नाही. याचीच प्रचिती करुन देणारा एक व्हिडिओ Desi Jugaad Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पठ्ठ्याने चक्क अशी काही डोकेबाजी केली आहे की, पाहणाऱ्याचे मनोरंजन तर होतेच आहे. पण, फिटनेस सोबत मजाही Fitness, Fun, and Science) घेता येते आहे आणि शास्त्रही पाहायला मिळत आहे. होय, सोशल मीडियावर हा व्हिडिओ खरोखरच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती व्यायामासाठी सायकल चालवत आहे. तर त्या सायकलमुळे नर्माण होणाऱ्या शक्तीच्या जोरावर एक मुलगा झोपाल्यात फिरत आहे. या व्यक्तीने तंत्रज्ञानाचा क्लृप्तीने वापर केला आहे.

आईपीएस अधिकारी दीपांशु काबरा (IPS Dipanshu Kabra) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की एक व्यक्ती सायकलवर व्यायाम करतो आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या शक्तीमुळे एक मुलगा झोपाळ्याचा आनंद घेत आहे. आपण अशा प्रकारचा झोपाळा एखाद्या पार्कमध्ये पाहिला असेल. पण, आपण व्हिडिओत ज्या पद्धतीचा जोपाळा पाहाता आहात तो चक्क घरीच बनवलेला आहे. आपण बारकाईने पाहाल तर सायकलवरील व्यक्ती सायकलवर पॅडल मारतो आहे आणि मुलगा झोपाळ्याचा आनंद घेतो आहे. (हेही वाचा, Sweeper's Viral Video: सफाई कर्मचारी करत होती डान्स, अचानक आला कॅफेचा मालक, पाहा व्हिडिओ)

ट्विट

लोकांनाही हा व्हिडिओ भलताच आवडला आहे. लोक या व्हिडिओचे चांगलेच कौतुक करत आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे. त्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात 'फन+फिटनेस+फिजिक्स'. जबरतस्त '3 इन 1 फॉर्म्युला' अशा शब्दात कौतुक करत त्यांनी #SuperDad असा हॅशटॅगही वापरला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ सुमारे 19 हजार युजर्सनी पाहिला होता. युजर्स सातत्याने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. लाईक आणि शेअरही करत आहेत. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.