Sweeper's Viral Video: सफाई कर्मचारी करत होती डान्स, अचानक आला कॅफेचा मालक, पाहा व्हिडिओ
Lady Sweeper Dance | (Photo Credit -Twitter)

सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ येतात. व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ मात्र अस्सल असतत. ज्यात थोडीही कृत्रिमता पाहायला मिळत आहे. सोशल मीडयावर असाच एक व्हिडिओ (Viral Video) लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ एका सफाई कर्मचारी (Sweeper's Viral Video) महिलेचा आहे. जी आपले एका कॅफेत काम करते. सफाईचे काम करत असताना ती अचानक डान्स (Lady Sweeper Dance) करायला लागते. तिचा डान्स सरु असतानाच अचानक कॅफेचा मालक येतो आणि काम करत असताना डान्स करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला पाहतो. पुढे काय घडते तुम्हीच पाहा.

घडले असे की, कॅफेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणारी एक महिला कर्मचारी काम करत असते. कॅफेत संगीत सुरुच असते. अचानक या कर्मचाऱ्याच्या आवडीचे गाणे लागते आणि ती डान्सच करण्यास सुरुवात करते. झाले. डान्समध्ये ती इतकी बेभान झालेली असते की, आपण कॅफेत आहोत. काम करत आहोत. कॅमेरेही आहेत. याचे काहीच भान तिला राहात नाही. ती फक्त बेभान होऊन नाचत असते. ... आणि इतक्यात गंमत घडते. कॅफेचा मालक कॅफेत येतो. पाहतो तर काय ही महिला सफाई कर्मचारी डान्स करत आहे. डान्स करताना तिचे लक्षही नसते. पण अचानक तिचे लक्ष जाते आणि तिला समोर कॅफेचे मालक दिसतात. (हेही वाचा, Indian Wedding Funny Moments Video: घोडा बिथरला, नवरदेवाला घेऊन पळाला; पाहा व्हिडिओ)

व्हिडिओ

कॅफेचे मालक कॅफेत आले आहेत आणि ते आपला डान्स पाहत आहेत. हे लक्षात येताच ती महिला कर्मचारी लाजून चूर झाली. काहीशी घाबरीघुबरीही झाली. तिचे अवघडलेपण लक्षात येताच मालकांनी थेट टाळ्या वाजवल्या. तिला प्रोत्साहन दिले. तिच्या डान्सचेही कौतुक केले. अगदी काही सेकंदाचाच हा व्हिडिओ आहे. पण, सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे.