Indian Wedding Funny Moments Video: घोडा बिथरला, नवरदेवाला घेऊन पळाला; पाहा व्हिडिओ
Indian Wedding Funny Moments | (Photo Credit - Instagram)

विवाह (Wedding) म्हटले की अनेक मजेदार प्रसंग ठरलेले. त्यात नवरा आणि नवरी यांच्याबाबत तर फारच उत्सुकता. त्यात लग्न हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने हौसेमौजेला तोटा नसतो. त्यातूनच अनेक लोक लग्नात घोडा आणतात. त्यावर बसून वरात, गावदेव आणि मिरवणूक काढली जाते. पण, हा घोडा निट वागला (Horse Funny Video) तर ठिक. नाहीतर भलतीच आफत ओडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका नवरदेवावर भलताच बाका प्रसंग आल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहाल तर हे लग्न त्या नवरदेवासाठी किती संस्मरणीय (Indian Wedding Funny Moments Video) झाले असेल याची कल्पना करु शकता. कारण हा घोडा नवरदेवासह भर मांडवातून पळाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @mediaghantaa या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की नवरदेव घोड्यावर बसला आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी जमली आहेत. संगिताचे स्वर कानी पडत आहेत. नवरदेव घोड्यावर बसला आहे. कसलासा विधी सुरु आहे. सर्व लोक उत्साहात आहेत. या उत्साहाच्या भरात कोणीतरी व्यक्ती अचानक फटाका फोडते आणि घोडा बिथरतो. गंमत अशी की बिधरलेला घोडा पाठवर बसलेल्या नवरदेवासह पळून जातो. नवरदेवासह पळालेला घोडा कुठे जाऊन थांबला याबाबत व्हिडिओत काही दिसत नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मात्र भलत्याच मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा, Dog Riding Horse: कुत्र्याची घोडेस्वारी, High Jump पाहून सोशल मीडियावर युजर्सनाही वाटले कौतुक (Funny Video Of Animal))

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास 4 लाख युजर्सनी लाईक केला आहे. तर लक्षवधी लोकांनी पाहिला आहे. अनेकांन तो शेअरही केला आहे. एका युजर्सने म्हटले आहे की, खरे तर नवरी पळून जाते. पण इथे तर चक्क घोडाच नवरदेवाला घेऊन पळाला आहे. दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे की, घोड्याने नवरदेवाला दुसरी संधी दिली आहे.