Viral Soya Chaap Manufacturing Video: सोया छाप बनवण्याचा गलिच्छ व्हिडिओ वायरल; Soy आणि  Soya Chaap सारखंच असत का? जाणून घ्या या स्ट्रीट फूड बद्दल
Soya Chaap Dish (Photo Credits: Wikimedia Commons)

सोशल मीडीयामध्ये सोया छाप (Soya Chaap) बनवण्याचा एक व्हिडिओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर चर्चा करत भविष्यात सोया छाप न खाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. @Abhirajputfit या ट्वीटर युजर कडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये काही युजर्सनी सोया छाप बनवण्याची प्रक्रिया नकारात्मकतेने घेतली आहे. यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्याच्या खाण्याबद्दलही साशंकता व्यक्त केली आहे. Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा'; नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला .

सोया आणि सोया छाप एकच आहे का?

सोया आणि सोया छप दोन्ही सोयाबीनपासून बनवले जातात. ते वेगळे प्रोडक्ट्स आहेत. सोया म्हणजे सोयाबीनचाच भाग आहे, तर सोया छाप ही सोयाबीनच्या प्रथिनांपासून बनवलेली विशिष्ट डिश आहे. सोया छाप मध्ये काही न्युट्रिशनल बेनिफिट्स कायम राहतात. सोया छाप किती आरोग्यदायी आहे हे त्याच्या बनवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. सामान्यपणे 100 ग्रॅम सोया छाप मध्ये 120 कॅलरीज असतात, 1.5 ग्राम फॅट्स असतात, 13 ग्राम प्रोटीन असतात तर 11 ग्राम कार्बोहायड्रेट्स, 2 ग्राम साखर आणि 3 ग्राम डाएटरी फायबर आहेत. तर सोडियम चे प्रमाण वेगवेगळे असू शकते.

सोया छाप खाणं हेल्दी आहे का?

तज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा सोया छाप हे कॅलरी रीच पदार्थांमध्ये जसे की तेल, बटर, मैदा मध्ये बनवले जाते तेव्हा ते वजन वाढवते. हे घटक कॅलरीज वाढवतात. त्यामुळे त्याच्या बरोबरीने व्यायाम न केल्यास किंवा लोअर कॅलरी फूड सोबत न खाल्ल्यास वजन वाढू शकते. काही वेळेस पदार्थांमध्ये डीप फ्राय पद्धती वापरली जाते. त्यामुळे देखील कॅलरी वाढू शकतात. सोया हे स्वतः प्रोटीन चा स्त्रोत आहे. त्यामुळे त्याच्यासोबतचे पदार्थ आणि सोया छाप बनवण्याची पद्धत याचा नक्कीच परिणाम वजनावर पडतो.

सोया छाप कसं बनवलं जात आहे याबाबत खवय्यांनी दक्ष असणं आवश्यक आहे. हेल्दी राहण्यासाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी देखील पाहणं आवश्यक आहे.