तुर्की: दोन वर्षांची मुलगी दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडली; युवकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण (Watch Video)
Teenager saves girl falling from building (Photo Credits: CGTN YouTube)

तुर्की येथील इस्तांबुल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका दुमजली इमारतीवरुन एक 2 वर्षांची मुलगी खाली पडली. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या एका 17 वर्षीय युवकाने तिला अलगद झेलले. त्यामुळे तिचा जीव वाचला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोहा मोहम्मद असे या मुलीचे नाव आहे. ती आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घरातील बाल्कनीत खेळत होती. खेळता खेळता ती पडली. मात्र रस्त्यावर उभ्या असणाऱ्या 17 वर्षीय युवकाचे तिच्याकडे लक्ष गेले आणि त्याने तिला अलगद झेलले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. (लहान मुलीला वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड; पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

फेउजी जबाट या 17 वर्षीय मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या चिमुकलीचे प्राण वाचले. यानंतर या मुलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.