लहान मुलीला वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड; पहा व्हिडिओ
Dog Saves Girl (Photo Credits: Youtube)

साधारणपणे आपल्याकडे प्रामाणिक प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिले जाते. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना असेल. कुत्र्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम आणि त्याच्या मनात असलेला प्रामाणिकपणा याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. कुत्र्याला माणसाचा प्रामाणिक मित्र का म्हणतात, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा लक्षात येईल.

एका लहान मुलीचा चेंडू तलावात पडतो. तो काढण्यासाठी ती तलावापाशी जाते. त्या निरागस मुलीला आपण पाण्यात पडून बुडू या सर्व गोष्टी लक्षात येत नाहीत. अशा वेळी कुत्रा तिला खेचून तलावाच्या काठापासून दूर करतो आणि पाण्यात पडलेला तिचा चेंडूही काढून देतो. कुत्र्याचा हा प्रामाणिकपणा दाखवणारा 16 सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. Physics-astronomy.org अकाऊंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल. ('डॉक्टर माझे खाऊचे सगळे पैसे घ्या! पण, कोंबडीच्या या पिल्लाचे प्राण वाचवा', चिमूकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

पहा व्हिडिओ:

 

प्राणीप्रेमींना कुत्र्यांच्या आपुलकी, प्रेम आणि प्रामाणिकतेबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही. याचा अनुभव प्राणीप्रेमी सातत्याने घेत असतील. तसंच घरात कुत्रा पाळला असल्यास तुम्हाला कुत्र्याच्या मायेचा रोजच अनुभव येत असेल. मात्र हा व्हिडिओ खरंच बोलका आहे.