Hungry Bear: नदीकिनारी बसलेल्या अस्वलाने अत्यंत चतुराईने केली माशाची शिकार; पहा व्हायरल व्हिडिओ
Hungry Bear Viral Video (Photo Credits: Twitter/Nature is Scary)

Hungry Bear: तुम्हाला माहित असेल की, अस्वल (Bear) मांसाहारी (Non vegetarian) नसले तरी ते बरेचं प्रकारचे पदार्थ खाऊ शकते. विशेष म्हणजे अस्वलांच्या दाताचा पोत एवढा खास असतो, की, त्यांना कोणताही पदार्थ खाण्यात अडचण येत नाही. अस्वल कोणताही पदार्थ सहजपणे खाऊ शकतो. अस्वलाचं मुख्य अन्न मासे, फळे, चिमण्याची अंडी, कोकरू, मुळे आणि वनस्पतींची पाने इत्यादी आहेत. मात्र, त्यांना मध हा पदार्थ जास्त आवडतो. सोशल मीडियावर अस्वलांचे अनेक व्हिडिओ नेटीझन्सचं मनोरंजक करत असतात. सध्या असाचं एक अस्वलाचा व्हिडिओ (Bear Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अस्वल अत्यंत हुशारीने माशाची शिकार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेचर इस स्केरी (Nature is Scary) या ट्विटर हँडलसह शेअर करण्यात आला आहे.

नेचर इस स्केरीने हा व्हिडिओ शेअर करताना 'ब्राऊन रंगाचं अस्वल मासे पकडत आहे,' असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.3 M लोकांनी पाहिला असून हजारो नेटीझन्सनी त्याला लाईक केलं आहे. याशिवाय अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. (हेही वाचा - Viral Video: नदीच्या प्रवाहात वा-याच्या वेगासारखा धावणारा Moose प्राणी पाहून नेटिझन्स झाले हैराण; पाहा अचंबित करणारा व्हिडिओ)

दरम्यान, सुमारे 20 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक अस्वल नदीकाठावर बसलेले दिसत आहे. यावेळी नदीचा प्रवाह जोरदार दिसून येत आहे. हे अस्वल अत्यंत चपळाईने आपल्या तोंडातून नदीच्या पाण्यातून मासा पकडते आणि झुडुपात जाऊन बसते. भूकेलेल्या अस्वलाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अस्वलाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रत्येक व्हिडिओमधून अस्वलाची हुशारी समजणं सोप्प झालं आहे.