
मूस (Moose) हा सस्तन प्राणी म्हणून ओळखला होता. हा हरणांच्या प्रकारातील सर्वात मोठा हरण आहे. मात्र याच सस्तन प्राण्याचा नदीच्या प्रवाहात वा-याच्या वेगाने धावणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ टिकटॉकवर kristy_234 या यूजरने सर्वात आधी टाकला होता. हा व्हिडिओ अलास्का (Alaska) मध्ये घेण्यात आला आहे. या नदीतील पाणी उथळ असून सुद्धा यावर मूस हा प्राणी अफाट वेगाने धावताना दिसत आहे. बोटीमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला असल्याने हे पाणी खोल असणार याचा अंदाज बांधता येईल. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया देत हा व्हिडिओ खरा आहे तर काहींना हा खोटा व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे.
हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून असा प्रकार कसा काय घडू शकतो याचा लोक विचार करत आहे. A Giant Rat Found In Mexico: मॅक्सिकोमध्ये सापडला माणसापेक्षा मोठा उंदीर; सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य घ्या जाणून
पाहा अचंबित करणारा हा व्हिडिओ:
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटक-यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण म्हणत आहे की असा व्हिडिओ शूट करून बोटमन त्या मूसचा जीव धोक्यात घालत आहे. कारण बोटीच्या भीतीपायी हा पाण्यात वेगाने पळत आहे. तर काही जण मूस प्राणी पाण्यावर धावू शकतो हे पाहून आश्चर्य व्यक्त करत आहे. तर काही मूसच्या खूरामध्ये चक्र असावीत ज्यामुळे तो इतका भराभर धावत आहे असे म्हटले आहे.
हा व्हिडिओ पाहून कोणाचेही डोळे चक्रावतील. कारण एवढ्या खोल पाण्यात हा प्राणी जराही न अडखळता, पडता कसा काय नदी ओलांडू शकतो याबाबत अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.