A Giant Rat Found In Mexico (Photo Credit: Twitter)

नाले, अस्वच्छता, खाण कचरा, ज्याठिकाणी असतो, तिथे नेहमी आपल्याला उंदीराचा सुळसुळाट पाहायला मिळतो. मात्र, मॅक्सिकोमध्ये नाले साफ करताना सफाई कर्मचाऱ्यांना चक्का माणसाच्या आकाराचा उंदीर सापडला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या उंदिरचा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का लागला आहे. मात्र, यासंदर्भात तपास केला असून व्हिडिओत दिसणार उंदिरच असून भूतांचा उत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या हॅलोवीनसाठी तयार करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, हॅलोवीनदरम्यान लोकांना घाबरवण्यासाठी बनवण्यात आलेला हा उंदीर चुकून नाल्यामध्ये पडला आणि तिथेच अडकून राहिला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मॅक्सिकोमधील सफाई कर्मचारी हॅलोवीनसाठी बनवण्यात आलेल्या उंदराला साफ करताना दिसत आहेत. या उंदीरसमोर सफाई कर्मचारीदेखील अगदीच छोटे दिसू लागले आहेत. स्थानिक लोकांना हा उंदीर खरा वाटल्याने काही परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांनी हा उंदीर हॅलोवीनसाठी तयार करण्यात आला आहे, असे लोकांना सांगितले. त्यानंतर लोक शांत झाली. हे देखील वाचा-Viral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ट्विट-

एकदा जोरदार पावसामध्ये हा उंदीर वाहून गेल्याचा दावा या उंदरावर हक्क सांगणाऱ्या एवलीन नावाच्या महिलेने केला आहे. या उंदराचा शोध घेण्यासाठी आपण त्यावेळी अनेकांची मदत मागितली. नाल्यामध्ये त्याला शोधण्यासाठी इतरांना विनंती केली होती. त्यावेळी कोणीही आपली मदत केली नाही, असे एलवीन म्हणाली आहे. मात्र, अनेक वर्ष उलटून गेल्यानंतर हा उंदीर आज मला मिळाला आहे. मात्र, हा उंदीर मी माझ्याजवळ ठेवेन की नाही? हे मी ठापणे सांगू शकत नाही, असेही एलवीन म्हणाली आहे.