Advertisement
लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Ravi Shastri On Virat Kohli: रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य, असा थांबवता आला असता कोहलीचा निवृत्तीचा निर्णय  |  Air India Flight AI171 Crash: एअर इंडियाच्या AI171 विमान दुर्घटनेपूर्वी 'Mayday' कॉल; ATC कडून प्रतिसाद पोहोचला नाही  |  NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला क्रिकेट संघ आमनेसामने; सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल? नेदरलँड्स महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएसए महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना खेळणार आहेत. NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएसए महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना खेळणार आहेत. आज गुरुवारी 12 जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता उट्रेच्ट येथील स्पोर्टपार्क मार्सचॅल्करविर्ड येथे सामना खेळवला जाणार आहे. अधिकृत प्रसारक नसल्यामुळे, नेदरलँड्स महिला विरुद्ध यूएसए महिला टी20 सामना थेट प्रक्षेपित पाहण्याचा पर्याय चाहत्यांकडे उपलब्ध नसेल. त्यामुळे, चाहते रॉयल डच क्रिकेट असोसिएशनच्या यूट्यूब चॅनेलवर नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला टी 20सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. नेदरलँड्स महिला विरुद्ध यूएसए महिला टी20 थेट प्रक्षेपण तपशील  | 
 
गुरुवार, जून 12, 2025
ताज्या बातम्या
14 seconds ago

Viral Video: घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शिरले अस्वल, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या निवासी भागात प्राण्यांचा शिरकाव होण्याचा धोका अनेकदा असतो, कारण काहीवेळा प्राणी जंगलातून बाहेर पडून आजूबाजूच्या परिसरात घुसतात, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. हे प्राणी कधी पाळीव प्राण्यांना आपला शिकार बनवतात तर कधी ते माणसांवरही हल्ला करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे

व्हायरल Shreya Varke | Jul 04, 2024 11:13 AM IST
A+
A-

Viral Video: जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या निवासी भागात प्राण्यांचा शिरकाव होण्याचा धोका अनेकदा असतो, कारण काहीवेळा प्राणी जंगलातून बाहेर पडून आजूबाजूच्या परिसरात घुसतात, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. हे प्राणी कधी पाळीव प्राण्यांना आपला शिकार बनवतात तर कधी ते माणसांवरही हल्ला करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल कारचा दरवाजा उघडा पाहून गुपचूप घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसतो. जेव्हा एक महिला तिथे पोहोचते तेव्हा तिला कारमध्ये अस्वल पाहून धक्का बसतो आणि घाबरून तिला तेथून पळून जावे लागते. दरम्यान, व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या X खात्यावर शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शन आहे -  अस्वलाला कारमध्ये बंद करण्याचा प्रयत्न का केला?? शेअर केल्यापासून, या व्हिडिओला 6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. हे देखील वाचा: Air Pollution in India: वाढते वायू प्रदूषण भारतासाठी आव्हान; देशातील 10 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्याने दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू

कारमध्ये अस्वल दिसल्याने महिलेला बसला धक्का 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घराबाहेर एक कार उभी आहे, ज्याचा दरवाजा उघडा आहे. हातात फळांचा डबा घेऊन एक बाई येते, गाडीच्या दरवाज्यातून आत डोकावताच तिला अस्वल दिसते.

वास्तविक, गाडीत अस्वलाला पाहिल्यानंतर भीतीने महिला घाबरते आणि ती फळांची पेटी तिथे फेकून घराच्या आत पळाली. ती महिला निघून जाताच अस्वलही गाडीतून बाहेर पडते, इकडे तिकडे चालत गेल्यावर खाली पडलेली फळे खाऊ लागते.

SocialLY


Show Full Article Share Now