आमच्या येथे सर्व प्रकारचे राजकीय माज उतरून मिळतील, सोशल मीडियावर राजकीय स्थितीवर विनोदांची लाट
Political parties in Maharashtra | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यातील सत्तासंघर्ष न थांबल्याने निवडणूक निकाल लागूनही महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Devendra Fadnavis Resigns) द्यावा लागला. सध्या ते काळजीवाहू म्हणून कार्यरत आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही मिम्सही व्हायरल झाले आहेत. यात विद्यमान राजकीय स्थितीवरुन विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना टोले लगावण्यात आले आहेत. यातील काही व्हायरल मेसेज, राजकीय विनोद (Political Humor) आणि मिम्स लेटेस्टली मराठीच्या वाचकांसाठी.

आमच्या येथे सर्व प्रकारचे राजकीय माज उतरून मिळतील

आमच्या येथे सर्व प्रकारचे राजकीय माज उतरून मिळतील, आमच्या एकूण चार शाखा आहेत. प्रथम येईल त्यास प्राधान्य. एकाच सीटिंगमध्ये सर्व उपचार. आतापर्यत 2 पंतप्रधान, अर्धा डझन मुख्यमंत्री, 50 खासदार, 200 आमदार. 400 अखंड भावी आमदार यांनी उपचार करून घेतले आहेत. शल्यविशारद यांचा आणि माझा परिचय आहे. त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे

- गोविंदबाग, बारामती. मोदीबाग, पुणे., सिल्व्हर ओक, मुंबई, 6 जनपथ, दिल्ली.

ट्विटर युजर् ट्विट

ट्विटर युजर् ट्विट

ट्विटर युजर ट्विट

ट्विटर युजर ट्विट

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये जनतेचा स्पष्ट जनादेश आला असतानाही मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाचे कारण ठरला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. जनादेशाचा विचार करता भाजप हा 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, त्या खालोखाल शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणूक 2019 चा जनादेश पाहता भाजप – 105, शिवसेना – 56, राष्ट्रवादी – 54, काँग्रेस – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार बनविण्याची नैतिक जबाबदारी भाजपवर येते.