Skyscrapers Demolished: अवघ्या 45 सेकंदात शेकडो कोटींच्या 15 गगनचुंबी इमारती जमीनदोस्त; पहा अंगावर काटा आणणारा Video
China Skyscrapers Demolished (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगभरात वाढत्या लोकसंख्येमुळे, लोकांच्या राहण्यासाठी मोठ मोठ्या इमारतींचे बांधकाम वेगाने होत असते. अशा स्थितीत अनेक जीर्ण आणि जुन्या गगनचुंबी इमारती पाडल्या जातात आणि त्यांच्या जागी नवीन बांधकाम केले जाते. बहुमजली इमारती पाडणे हे काम एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. या कामात थोडीशी जरी चूक झाल्यास जीवित आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान होऊ शकते. अलीकडेच चीनमधून (China) असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. अवघ्या 45 सेकंदात 15 इमारती कोसळल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ चीनच्या युनान प्रांतातील कनमिंगचे (Kunming) चा असल्याचे समोर आले आहे. जिथे या गगनचुंबी इमारती 8 वर्षानंतर, त्यांचे बांधकाम पूर्ण न झाल्याने एकत्र पाडल्या गेल्या. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या मते, या इमारतींमध्ये 85,000 स्फोटक बिंदूंवर 4.6 टन स्फोटके ठेवली गेली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या 15 इमारती अवघ्या 45 सेकंदांमध्ये जमीनदोस्त झाल्या आहेत.

एका अहवालानुसार, 'इमर्जन्सी रेस्क्यू डिपार्टमेंट्स' ने या इमारती पाडताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 2,000 हून अधिक मदत कामगारांच्या 8 आपत्कालीन बचाव पथकांना बोलावले होते. यामध्ये साइट फायर रेस्क्यू टीम, आपत्कालीन टीम, पूर नियंत्रण आणीबाणी टीम आणि शहरी व्यवस्थापन टीम यांचा समावेश होता. हा धोकादायक स्फोट घडवण्यापूर्वी या 15 गगनचुंबी इमारतींच्या आसपासची सर्व दुकाने बंद करण्यात आली होती आणि जवळपास राहणाऱ्या लोकांनाही बाहेर काढण्यात आले होते. (हेही वाचा: गुजरात मध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या बाइकची खड्ड्यांमुळे ट्रॅकटरसोबत टक्कर, व्यक्तीच्या अंगावरुन गाडी लोटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस)

चिनी अधिकाऱ्यांनी या इमारती पाडण्याचा निर्णय घेतला कारण, बाजारात मागणी नसल्याने या इमारती बऱ्याच वर्षांपासून तशाच पडून होत्या. या इमारतींच्या तळघरात पावसाचे पाणी जमा होत असे. या इमारती लिआंग स्टार सिटी फेज 2 (Liyang Star City Phase II) प्रकल्पाचा भाग होत्या, ज्याची किंमत सुमारे 1 अब्ज चीनी युआन किंवा सुमारे 11 अब्ज रुपये होती.