Viral Image |

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील सानापाडा (Sanpada) येथील असल्याचा दावा केला जात आहे. ज्या व्हिडिओत मुसळधार पावासानंतर शहरांतील रस्ते निसरडे झाले असून, त्यावरुन जाताना वाहने घसरताना दिसत आहेत. आम्ही या व्हिडिओची सत्यपडताळणी केली असता भलतेच व्हायरल सत्य समोर आले. व्हायरल व्हिडिओत दिसणारा परिसर पाहता तसा परिसर नवी मुंबई अथवा सानपाडा परिसरात कोठेही आढळून येत नाही. त्यामुळे आम्ही सोशल मीडिया आणि इंटरनेटवही या व्हिडिओचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला आढळून आलेले सत्य असे की, हा व्हिडिओ सानपाडा येथील नव्हे तर पाकिस्तानमधील आहे.

हाती आलेल्या सत्यतेनुसार हा व्हिडिओ पाकिस्तानातील कराची येथील आहे. कराची येथे बुधवारी (22 जून) सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या वादळी पावसात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. झाडे रस्त्यावर पडली. अनेक ठिकाणी रस्तेही निसरडे झाले. परिणामी रस्त्यावरुन धावणारी वाहने मोठ्या प्रमाणावर घसरु लागली. अशा घटना घडत असलेल्या एका उड्डानपुलावरचा हा व्हिडिओ आहे. (हेही वाचा, Health Staff Cut Newborn's Head: धक्कादायक! प्रसृतीदरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कापले आईच्या पोटातील नवजात बाळाचे डोके)

व्हिडिओ

व्हिडिओ नेमका कुठला?

व्हायरल झालेला व्हिडिओ, जो आम्ही इथे दिला आहे. तो पाकिस्तानातील कराची येथील मिलेनियम मॉलजवळील रशीद मिन्हास रोडवरील फ्लायओव्हरील आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, अनेक मोटारसायकलस्वार पुलावरुन उतरताना एकामागून एक रस्त्यावर घसरताना दिसले. रस्त्यावरुन दुचाकी घसरल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांना मदत करताना आजूबाजूचे लोक धावून येत असल्याचेही येथे पाहायला मिळाले.