Fact Check: कोविड-19 ची नुकसान भरपाई म्हणून 1.60 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी RBI कडून Personal आणि Bank Account डिटेल्सची मागणी? PIB ने सांगितले सत्य
Fake RBI News (Photo Credits: PIB)

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात कोविड-19 ची नुकसान भरपाई (Covid-19 Compensation) म्हणून यूएन (UN) कडून 1.60 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) Personal आणि Bank Account डिटेल्सची मागणी करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरबीआयकडून एक ईमेल आला आहे त्यात युएन कडून कोविड-19 ची नुकसान भरपाई म्हणून 1.60 कोटींचे बक्षिस मिळवण्यासाठी बँक डिटेल्सची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.  हा मेसेज पुढील प्रमाणे आहे- "तुमचा ईमेल आयडी RBI promotional on COVID-19 2021 programme अंतर्गत शॉर्टलिस्ट झाला असून कोविड-19 नुकसान भरपाईचे 1.60 कोटींचे बक्षिस तुम्ही  UN कडून जिंकला आहात."

ही पोस्ट 'RB1 Compensation' या नावाने व्हायरल होत आहे. पुढे त्यांनी असा दावा केला आहे की, आरबीआयच्या कोणत्याही बँकेशी संपर्क केला तरी चालेल. तसंच यात नाव, पत्ता, मॅरेटीयल स्टेटस, पासपोर्ट डिटेल्स, बँक अकाऊंट डिटेल्स यांसारखी सर्व वैयक्तिक माहिती विचारली आहे. यामागील सत्य पीआयबी फॅक्ट चेक तपासले असून हा ईमेल फेक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आरबीआय कडून कधीच वैयक्तिक माहितीची विचारणा करण्यात येत नाही. (Fact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा? PIB ने केला खुलासा)

Fact Check By PIB:

सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमातून अनेक बातम्या व्हायरल होत असतात. या दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना बळी पडू नये म्हणून सरकारकडून वारंवार लोकांना जागरुक करण्यात येते. त्याचबरोबर फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सरकारकडून विविध पाऊलं उचलण्यात आली आहेत. तसंच कोणत्याही संदर्भातील अचूक माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.