PIBFactcheck: 'लॉकडाऊन, कोरोना व्हायरसमुळे फ्री इंटरनेट' हा सोशल मीडियावरील मेसेज खोटा; काय आहे सत्य?
Internet| (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronaviru) संकटाच्या पार्श्वभूमीवर 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व मोबाईल कंपन्यांनी सर्व मोबाईल ग्राहकांना इंटरनेट (Free Internet) मोफत देण्याची घोषणा केली आहे, अशी बातमी अगर माहिती तुम्ही वाचली तर मुळीच हुरळून जाऊ नका. कोणत्याही मोबाईल कंपनीने कोणत्याही ग्राहकांसाठी अशी ऑफर दिली नाही. त्याबाबत कोणती घोषणाही केली नाही. त्यामुळे सोशल मीडिया (Social Media) अथवा इतर कोणत्या माध्यमतून पसरलेल्या वृत्ताव विश्वास ठेऊ नका. मोफत इंटरनेट सेवेबाबतच्या वृत्ताचे दूरसंचार विभागाने खंडण केल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दूरसंचार विभागाचा हवाला देत फॅक्ट चेक पोस्ट केली आहे. या पो्स्टमध्ये कोणत्याही कंपनीने असी कोणताही ऑफर दिली नाही. त्यामुळे स्वत:ची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. पीआयबीच्या ट्विटमध्ये एक इमेजही देण्यात आली आहे. या इमेजमध्ये मोफत इंटरनेटचे वृत्त कशा पद्धतीने देण्यात आले आहे, याबाबत सांगितले आहे. तसेच, एक लिंकही दिली आहे. ज्यावरुन हा खोटे वृत्त पसरविण्यात आले. धक्कादायक असे की, या दिशाभूल करणाऱ्या मेसेजमध्ये ही ऑफर केवळ 17 मे 2020 पर्यंत असल्याचेही म्हटले आहे. पण, ही सर्व माहिती असत्य आहे. या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा पीआयबीने बुरखा फाडला आह.

ट्विट

दरम्यान, सोशल मीडिया अथवा इतर कोणत्याही माध्यमातून अफवा, पसरणे, दिशाभूल करणारे मेसेज पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. खास करुन न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोरोना व्हायरस महामारीबाबत कोणत्याही प्रकारे दिशाभूल करु नये. गांभीर्य ओळखून अफवा पसरवण्यापासून दूर राहावे. असे असूनही अनेक समाजकंटक नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता स्वत:ची फसवणूक टाळायला हवी.