सध्या सोशल मीडियाचा वापर फारच वाढला आहे. अशा विविध व्यासपीठांवर तितक्याच मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज (Fake News) म्हणजेच खोट्या बातम्या व्हायरल होत असतात. आता एक यूट्यूब व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की केंद्र सरकारकडून (Central Government) सर्व बॅक अकाउंट्समध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही बातमी खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे की, केंद्र सरकार प्रधानमंत्री मानधन योजनेच्या (Pradhan Mantri Mandhan Yojana) अंतर्गत हे पैसे जमा करणार आहे.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आणि बरेच लोक या बनावट बातमीवर खरोखर विश्वास ठेवत आहेत. म्हणूनच आता सरकारने पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) द्वारे याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या यूट्यूब व्हिडिओमध्ये केलेला दावा बनावट असल्याचे म्हटले आहे.
दावा: एक #YouTube वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार प्रधानमंत्री मानधन योजना के तहत सभी के खातों में प्रति माह 3000 रुपए की नगद राशि दे रही है।#PIBFactCheck: यह दावा फ़र्ज़ी है। केंद्र सरकार ऐसी किसी योजना के तहत प्रति माह 3000 रुपए नहीं दे रही है। pic.twitter.com/ZwcFRNfijt
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 5, 2020
याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात. ‘एका युट्यूब व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार पंतप्रधान मानधन योजनेंतर्गत सर्व खात्यात दरमहा 3000 रुपये जमा करत आहे. तरी हा दावा खोटा आहे. केंद्र सरकार अशा कोणत्याही योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये जमा करत नाही.’ पीआयबी फॅक्ट चेक हे एक समर्पित व्यासपीठ आहे जे सरकारी योजना आणि धोरणांशी संबंधित चुकीच्या माहिती प्रसारित होत असल्यास त्याबाबत स्पष्टीकरण देते.
(हेही वाचा: महात्मा गांधी बेरोजगार योजनेअंतर्गत केंद्र सरकार देत आहे Work From Home द्वारे रोजगाराची संधी? जाणून घ्या सत्य)
नुकतेच पीआयबी फॅक्ट चेकने एक बातमी बनावट असल्याचे उघडकीस आणली होती, ज्यामध्ये नमूद केले होते की, केंद्र सरकार अशी एक योजना चालवित आहे, त्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत घेऊ शकतात. तरी, आम्ही देखील आमच्या वाचकांना हीच विनंती करतो की, आपणही अशा कोणत्या व्हायरल गोष्टींवर त्याची सत्यता तपासण्याआधी विश्वास ठेऊ नका व ती पुढे पाठवू नका.