Homeopaths ना COVID-19 च्या रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी? PIB Fact-Check फेटाळलं वृत्त; जाणून व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हायरल मेसेज मागील सत्य
Fake news on WhatsApp | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये नागरिकांच्या मनात जशी अस्वस्थता वाढत आहे त्याचा गैरफायदा घेत आता खोट्या बातम्या, अफवांचंदेखील जाळं पसरवलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या कोव्हिड 19 वर उपाय म्हणून होमिओपॅथी औषधांचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती फिरत आहे. मात्र PIB या सरकारी मीडिया विभागाकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे.

PIB Fact Check या सोशल मीडिया हॅन्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्राने अद्याप कोव्हिड19 च्या रूग्णांवर होमिओपॅथीने उपचार करण्यास परवानगी दिलेली नाही. दरम्यान थेट उपचाराऐवजी विशिष्ट कालावधीसाठी आयुषमंत्रालयातून एका प्रोजेक्टचा भाग म्हणून क्लिनिकल मॅनेजमेंटसाठी रिसर्चचा भाग म्हणून आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाच्या परिणामाची चाचपणी करण्यासाठी मान्य केली आहे. मुंबई: कोरोनामुक्त 4 रूग्णांमध्ये आढळल्या अ‍ॅन्टी बॉडीज; अत्यावस्थ रुग्णांना Plasma Therapy देण्यासाठी होणार मदत, BMC चे COVID Survivors ना प्लाझ्मा डोनेशचं आवाहन.

PIB Fact Check's Tweet

भारतामध्ये कोरोनाबाधितांवर सरकारी आणि काही खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोव्हिड 19 हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याला रोखण्यासाठी रूग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवून symptomatic treatment ने उपचार केले जात आहेत.

दरम्यान अद्याप कोरोना व्हायरसवर कोणतीही लस, ठोस औषध नसल्याने जगभरातून परिणामकारक लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान जगात कोरोनाबाधितांच्या आकडा 30 लाखांच्या जवळ पोहचला आहे. तर 2 लाखाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 27 हजारांच्या पार गेला आहे. तर 872 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.