Paneer Tikka Funny Memes:अमेरिकेच्या कॉंग्रेसवुमन Pramila Jayapal यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत Kamala Harris यांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना 'पनीर टिक्का' म्हणून बनवलेल्या डिशवरून नेटकर्‍यांनी घेतली त्यांची शाळा; पहा मजेशीर मिम्स
Paneer Tikka (Photo Credits: Twitter)

अवघ्या जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणूक 2020 कडे लागलं आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टीकडून डॉनल्ड ट्र्म्प आणि डेमोक्रॅटिक्स कडून जो बायडन यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू आहे. यंदा बायडन यांच्यासोबत उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस निवडणूकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यामुळे भारतीयांचेदेखील या निवडणूक आणि निकालाकडे विशेष लक्ष होते. दरम्यान यामध्येच अमेरिकेतील निवडणूक आणि निकालामध्ये पनीर टिक्काची कालपासून विशेष चर्चा सुरू आहे. अनेकांना सोशल मीडियावर या पनीर टिक्काच्या ट्रेंडचं गणित अजून उमजलं नसेल तर जाणून घ्या नेमकं घडलं काय?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकपदाच्या मतदानामध्ये पनीर टिक्का कनेक्शन काय?

दरम्यान काल मतदानाचं आवाहन करताना युएस कॉंग्रेसवुमन प्रमिला जयपाल यांनी ट्वीट करत कमला हॅरिस यांना मतदानाचं आवाहन करताना 'पनीर टिक्का' केल्याचं ट्वीट केलं होतं. दरम्यान ट्वीट मध्ये त्यांनी पोस्ट केलेली डिश ही पनीर टिक्का नसून पनीर ग्रेव्ही मसाला सदृश्य काही पदार्थ होता. यावरून अनेक नेटकर्‍यांनी प्रमिला जयपाल यांना ट्वीट करत त्यांची 'पनीर टिक्का'वरून शाळा घेतली. त्यानंतर काही मजेशीर मिम्स देखील ट्वीट केले. US Presidential Election 2020: अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार Kamala Harris नेमक्या कोण? जाणून घ्या त्यांचा भारताशी संबंध ते राजकीय कारकीर्दीचा आढावा.

पनीर टिक्का वरून मजेशीर ट्वीट

सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरूवातीला जो बायडन आणि डॉनल्ड ट्र्म्प यांच्यामध्ये सुरू असलेल्या अटीतटीच्या लढाईमध्ये आता चित्र स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. फ्लोरिडा हे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निकालामध्ये महत्त्वाचं मानलं जाणारं राज्य डॉनाल्ड ट्र्म्प यांनी जिंकलं आहे.