US Presidential Election 2020: अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार Kamala Harris नेमक्या कोण? जाणून घ्या त्यांचा भारताशी संबंध ते राजकीय कारकीर्दीचा आढावा
Kamala Harris| Photo Credits: Instagram/ Kamala Harris

अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ब्लॅक आफ्रिकन अमेरिकन आणि भारतीय वंशाचा उमेदवार उपराष्ट्रपदाच्या निवडणूकीमध्ये सहभागी आहे. कमला हॅरिस (Kamala Harris) या महिलेला डेमोक्रॅटिक्स पक्षाकडून ही मोठी संधी मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे असलेल्या जो बायडन (Joe Biden) यांनी कमला हॅरिस यांची उपराष्ट्र पती पदासाठी त्यांची साथिदार म्हणून निवड केली आहे. दरम्यान या घोषणेमुळे अमेरिकेतील भारतीय समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मग जाणून घ्या इतकी मोठी संधी मिळालेली ही भारतीय वंशाची महिला कमला हॅरिस नेमकी कोण? काय आहे त्यांचा राजकीय प्रवास आणि भारताशी संबंध?

कमला हॅरिस नेमक्या आहेत कोण?

  • कमला हॅरिस या 55 वर्षीय अमेरिकन सेनिटर आहेत. 2017 पासून त्या कॅलिफोर्नियामध्ये ज्युनियर युएस सिनेटर म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.
  • कमला हॅरिस या अमेरिकन राजकीय नेत्या आणि वकील देखील आहे. त्यांचे वडील आफ्रिकन आणि आई भारतीय वंशाची आहे. आई श्यामला गोपालन डॉक्टर तर वडील अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.
  • कमला हॅरिस यांची आई श्यामला मूळच्या चैन्नईच्या असून त्या वैद्यशास्त्राची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत आल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

My mother never asked for permission to tell her what was possible—and that’s why I’m in this race.

A post shared by Kamala Harris (@kamalaharris) on

  • कमला हॅरिस यांचे शिक्षण हावर्ड युनिव्हर्सिटी मधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये झाले आहे. 1990 मध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम केले.

  • 2003 ते 2011 दरम्यान त्यांनी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम केले आहे. 2016 साली त्यांनी रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांच्यावर मात करून अमेरिकन सिनेट मध्ये ज्युनियर रिप्रेसेंटेटीव्ह म्हणून प्रवेश मिळवला.
  • हॅरिस या दुसर्‍या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन महिला होत्या ज्यांना अमेरिकन कॉंग्रेसच्या अपर चेंबर मध्ये प्रवेश मिळाला होता.
  • सिनेटर म्हणून त्या राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांच्या विरोधक आहेत.
  • Geraldine Ferraro आणि Sarah Palin यांच्यानंतर अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपतींच्या शर्यतीमध्ये असणार्‍या त्या तिसर्‍या महिला आहेत.
  • उप राष्ट्रपती पदासाठी त्यांच्यासमोर डॉनल्ड ट्रम्प यांचे साथीदार माईक पेंस यांचं आव्हान आहे.

दरम्यान कमला हॅरिस यांची उमेदवारी ही अत्यंत नाजूक मानली जात आहे. त्या पहिल्या आफ्रिकन अमेरिकन आणि साऊथ एशियन अमेरिकन उमेदवार आहेत. ज्याला अमेरिकेमध्ये उप राष्ट्रपती पदासाठी मोठ्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात या निवडणूका पार पडणार आहेत.