US Presidential Election 2020: Kamala Harris, भारतीय वंशाच्या सिनेटरची अमेरिकेच्या उपराष्ट्रपदी उमेदवार म्हणून निवड; Joe Biden यांची  घोषणा
Joe Biden and Kamala Harris. (Photo Credits: Twitter|@JoeBiden)

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी उपराष्ट्रपती पदासाठी कमला हैरिस (Kamala Harris) यांची निवड केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्या भारतीय वंशाच्या असून कॅलिफोर्निया मधील सिनेटर आहेत. कमला हैरिस या पहिल्या आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या उमेदवार आहेत ज्यांना पक्षाकडून इतकी मोठी संधी मिळाली आहे.

कमला हैरिस यांची निवड करताना जो बायडन यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये देशातील उत्तम पब्लिक सर्व्हंट कमला हैरिस यांची निवड उपराष्ट्रपती पदासाठी करताना मला अभिमान आहे अशा आशयाचं ट्वीट केले आहे. नक्की वाचा:  US Presidential Election 2020: राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी Donald Trump आणि Joe Biden यांच्यामध्ये 29 सप्टेंबर ला पहिलं डिबेट!

Joe Biden यांचे ट्वीट

कमला हैरिस जेव्हा कॅलिफॉर्नियाची अटॉर्नी जनरल होती तेव्हा मेऐ तिचं काम पाहिलं आहे. कमलाने अनेक मोठ्या बॅंकांना आव्हान दिलं होतं, काम करणार्‍यांना मदत केली होती. तसेच लहान मुलांना, महिलांना शोषणापासून दूर ठेवण्यासाठी काम केले आहे. मला त्यावेळेसही गर्व होता आणि आता देखील मला तिच्यावर गर्व असल्याचं म्हणत जो बायडन यांनी कमलावर ट्वीटच्या माधयमातून स्तुतिसुमनं उधळली आहेत.

कमला हैरिस यांचे वडील आफ्रिकन असून आई भारतीय वंशाच्या आहेत. कमला यांना उपराष्ट्रपदाची उमेदवार म्हणून संधी मिळाल्याने अनेक अमेरिकन भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

कमला मागील निवडणूकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये होत्या. मात्र त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता. आता अमेरिकेत यंदाची राष्ट्रपती निवडणूक 3 नोव्हेंबर दिवशी पार पडणार आहे.