Donald trump & Joe Biden (Photo Credits: ANI)

अमेरिकेमध्ये सध्या कोरोनाचे थैमान सुरू असताना आता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीची देखील तयारी सुरू झाली आहे. दरम्यान Commission on Presidential Debates ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा निवडणूकीसाठी रंगणारं पहिलं डिबेट 29 सप्टेंबर दिवशी आहे. ओहियो (Ohio) मध्ये क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्याकडून हे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान डॉनल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरूद्ध डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांचे आव्हान आहे.

दरम्यान जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प हे 3 नोव्हेंबर दिवशी निवडणूकीचा सामना करणार आहेत. कमिशन ऑन प्रेसिडेन्शिअल डिबेट्स यांनी दुसर्‍या डिबेटचं आयोजन 15 ऑक्टोबर दिवशी फ्लोरिडातील मायामी शहरामध्ये केले आहे. तर तिसरी आणि अंतिम डिबेट 22 ऑक्टोबर दिवशी नॅशविलेमध्ये बेल्मॉन्ट युनिव्हर्सिटीत होणार आहे.

राष्ट्राध्यक्षपदच्या निवडणूक डिबेट्स सोबतच अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी देखील डिबेट्सचं आयोजन करण्यात येते. त्यानुसार, 7 ऑक्टोबर दिवशी पहिली डिबेट सॉल्ट लेक सिटी युनिव्हर्सिटीमध्ये होईल. उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांच्यासमोर डेमोक्रेट्रिक पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.

सारी डिबेट्स 90 मिनिटांची असून रात्री 9 ते 10.30 (ET)या वेळेत दाखवली जाणार अहेत. दरम्यान यामध्ये कमर्शिअल ब्रेक नसेल. तसेच त्याचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग White House pool networks कडून होईल.