पाकिस्तानी गायिका रबी पीरजादा हिने ट्विटरवर शेअर केला अंगाला स्फोटेक बांधल्याचे छायाचित्र; पंतप्रधान मोदींना म्हणाली हिटलर
Pakistani Singer Rabi Pirzada | (Photo Credit -twitter)

चित्र-विचित्र हरकती आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी पाकिस्तानी गायिका रबी पीरजादा (Pakistani Singer Rabi Pirzada) हिने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. रबी पीरजादा (Rabi Pirzada) हिने अंगावर स्फोटकांनी भरलेले जॅकेट परिधान करुन छायाचित्र कढले आहे. छायाचित्र तिने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही शेअर केले आहे. धक्कादायक म्हणजे या छायाचित्रासोबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनाही हिटलर (Hitler) म्हणून संबोधले आहे. तिच्या या वर्तनामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सकडून नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, पीरजादा हिने परिधान केलेले स्फोटक भरलेले जॅकेट हे खरे आहे की खोटे हे समजू शकले नाही.

रबी पीरजादा हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले छायाचित्र हे सोशल मीडियावर भारतीय नेटीझन्ससाठी एक विनोदाचा विषय ठरले आहे. तिचे हे छायाचित्र पाहून अनेक लोक तिच्यावर टीकात्मक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. भारतातील एका यूजरने म्हटले आहे की, 'रबी ही कराची येथील फॅशन वीकसाठी स्वत:ला सज्ज करत आहे.' तर, दुसऱ्या युजरने लिहीले आहे की, 'रबी दिवाळीच्या मुहूर्तावर फुटू नकोस' (हेही वाचा, हातात अजगर, शेजारी मगर घेऊन भडकली पाकिस्तानी गायिका Rabi Pirzada; भारतीय आणि पीएम नरेंद्र मोदींना दिली साप हल्ल्याची धमकी (Video))

रबी पीरजादा ट्विट

रबी पीरजादा ट्विट

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

India

Japan

Bhutan

Pakistan pic.twitter.com/hl4G8yIcjk

— AlkaSingh (@ThAlkaSingh) October 23, 2019

दरम्यान, ही रबी पीरजादा तिच आहे जी गाण्यापेक्षा आपल्या इतर कृत्यांमुळे चर्चेत राहते. या आधी रबी पीरजादा हिने 50 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साप आणि मगरींच्या हल्ल्याची धमकी देताना दिसत होती. पण, गंमत अशी की, तिने ज्या मगरी आणि सापांची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला होता ते सर्व प्राणी लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानातून खरेदी करण्यात आले होते.