MyGovIndia TikTok Account: भारत सरकारच्या नावाने टिकटॉक वर खोटे अकाउंट होतेय व्हायरल, पहा अधिकृत अकाउंट कसे ओळखावे?
MyGovIndia TikTok (Photo Credits: TikTok/@mygovindia)

टिकटॉक (TikTok) ची प्रसिद्धी हा काही नवा विषय नाही. मात्र मागील काळात विशेषतः युट्युब विरुद्ध (TikTok vs Youtube) वादामुळे या ऍपची प्रसिद्धी आणखीनच वाढली आहे. असं असलं तरी बहुतांश वेळा ही प्रसिद्धी वादाचा मुद्दा ठरली आहे. यापूर्वी आक्षेपार्ह्य कंटेंट दाखवल्याने टिकटॉक विरुद्ध वाद सुरु होता. तर आता टिकटॉक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. टिकटॉक वर MyGovIndia च्या नावाने अनेक बनावट खाती सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. भारत सरकारच्या अधिकृत अकाउंट ची ही कॉपी आहे. या अकाऊंटची नावे mygovindia20, india.gov.in, mygovindia2, mygovindia4, and mygovindia5 अशी आहेत. बहुतांश वेळा या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्याचे काम केले जाते. अलीकडेच या अकाउंटसचा खुलासा झाल्याने भारत सरकारतर्फेच यावर स्पष्टीकरण देऊन खोट्या  अकाउंटपासून लांब राहण्याचे आवाहन केले गेले आहे. TikTok Video साठी कुत्र्याला पाण्यात फेकणाऱ्या तरुणांना शोधण्यासाठी PETA तर्फे 50 हजाराचे बक्षीस जाहीर, पहा व्हिडीओ

सिटिझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म हे भारत सरकारचे अधिकृत टिकटॉक हँडल आहे, @MyGovIndia (CLICK HERE FOR TikTok LINK.) असे त्याचे युजरनेम आहे. सरकारी योजना आणि योजनांची माहिती देण्यासाठी या प्रसिद्ध माध्यमाचा वापर करता यावा म्हणून हे अकाउंट बनवण्यात आले आहे. कोरोना व्हायरस संकटकात या विषाणूबद्दल माहिती देण्यासाठी तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी ही प्रोफाईल वापरकर्त्यांना प्रोत्साहित करते. या प्रोफाइलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचे छोटे व्हिडिओही पोस्ट करण्यात आले आहेत.

MyGovIndia च्या नावाचे Fake Account

(Photo Credits: Screenshot)

MyGovIndia हे 2014 मध्येच स्थापित करण्यात आले होते. देशातील सरकार आणि विकासात नागरिकांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. MyGovIndia चे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम वर सुद्धा त्याचे अधिकृत खाते आहे. याआधी सुद्धा या अकाउंटची कॉपी केलेले फेक अकाउंट दिसून आले होते. मात्र अशावेळी युजर्सनी सतर्क राहून योग्य अकाऊंटच फॉलो करणे आवश्यक आहे.