मागील काही दिवसांपासून भारतात विविध कारणाने टिक टॉक( TikTok) सतत चर्चेत येत आहे. दुर्दैवाने यातील अनेक व्हिडीओज हे आक्षेपार्ह्य असल्याने एकूण या ऍप वर आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर नेटकऱ्यांनी शब्दाची तलवारच रोखून धरली आहे. कितीही टीका होत असल्या तरी या प्रकारचे आक्षेपार्ह्य व्हिडीओज व्हायरल (Viral TikTok Video) होणे काही थांबत नाहीये, असाच एक भीषण व्हिडीओ नुकताच समोर आला होता. या मध्ये दोन माथेफिरू तरुण कुत्र्याला हात पाय धरून पाण्यात फेकत असताना दिसून येत आहेत. तळ्यात फेकले असताना या कुत्र्यावर तरुणांनी दगडफेक सुद्धा केल्याचे व्हिडीओ मध्ये दिसले होते. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की थेट PETA तर्फे सुद्धा याची दखल घेतली गेली. PETA ने या व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणानं पकडण्यासाठी चक्क 50 हजार रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर केले आहे. TikTok Video: मुजीबुर रहमान याचा बलात्काराला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ पाहून NCW च्या रेखा शर्मा यांची केंद्र सरकारला टिकटॉक बॅन करण्याची विनंती
तुम्हाला या व्हिडिओ मध्ये असणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती असेल तर तुम्ही PETA शी संपर्क साधून त्यांना मदत करू शकालही माहिती देण्यासाठी +91 9820122602 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल अन्यथा PETA ला थेट मेल सुद्धा करू शकता. योग्य माहिती देऊन या तरुणांना अटक करण्यासाठी मदत करणाऱ्यांना 50हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.
पहा हा व्हायरल व्हिडीओ
Got this Video via whatsapp , Please Ban tiktok . pic.twitter.com/j8uYP13FKE
— Tarun choubey (@Tarunchoubey4) May 20, 2020
जर का तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हालाही या तरुणांचे वागणे पाहून चीड येईल. या दोघांनी गमतीत कुत्र्याचे हातपाय बांधून त्याला तलावात फेकून दिले होते. यावेळी कुत्रा विव्हळत आपल्या सुटकेसाठी ओरडत होता मात्र व्हिडीओज आणि व्ह्यूजच्या मागे लागलेल्या या तरुणांनी त्या मुक्या प्राण्याची आर्जवे दुर्लक्षित केली. किंबहुना आपण करत असलेले कृत्य हे गंमत आहे असे समजत असल्याने त्यांना त्याच्या गंभीरतेची जाणीव सुद्धा असेल असे वाटत नाही.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून #BanTikTokIndia हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. सुरुवातीला युट्युब विरुद्ध टिक टॉक हा वाद आणि त्यांनतर बलात्कार, ऍसिड अटॅक सारख्या संवेदनशील मुद्द्यांवर व्हायरल झालेली आक्षेपार्ह्य व्हिडीओ यामुळे टिक टॉक चर्चेत आहे.