Mumbai Teacher Develops Humanoid Robot Shalu: कम्प्यूटर सायन्सच्या शिक्षकांनी विकसित केला 47 भाषा बोलणारा मानवी रोबोट; पहा Video
Mumbai Teacher Develops Humanoid Robot Shalu (Photo Credits: Youtube)

आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथील केंद्रीय विद्यालयातील (Kendriya Vidyalaya) एका कम्प्युटर सायन्स (Computer Science) शिक्षकाने मानवी रोबोट (Humanoid Robot) तयार केला आहे. हा रोबोट  9 स्थानिक भाषा आणि 38 विदेशी भाषा बोलू शकतो. शालू असे या रोबोटचे नामकरण करण्यात आले आहे. एका महिलेप्रमाणए दिसत असणारा हा रोबोट इंग्रजी, हिंदी, भोजपुरी, मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगू आणि मल्याळम या 9 भाषा बोलतो. दरम्यान, हा रोबोट विकसित करणाऱ्या शिक्षकाचे नाव दिनेश पटेल (Dinesh Patel) असे आहे. बॉलिवूड सिनेमा रोबोट पाहून त्यांना शालू (Shalu) रोबोट विकसित करण्याची प्रेरणा मिळाली.

विशेष म्हणजे शालू रोबोट हा हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्सने  (Hanson Robotics) विकसित केलेल्या रोबोट सोफिया (Sophia) सारखाच आहे. हात-मान हलवणे, हसणे आणि रागाच्या भावना प्रदर्शित करणे इत्यादी क्रिया शालू रोबोट अगदी मानवाप्रमाणे करु शकतो.

पटेल यांनी सांगितले की, शालू रोबोट हा प्लास्टिक, पुठ्ठा, लाकूड, अॅल्युमिनियम इत्यादी टाकाऊ सामानाचा वापर करुन तयार करण्यात आला आहे. हा रोबोट तयार करण्यासाठी तब्बल 3 वर्ष लागले तर 50 हजार रुपये खर्च आला. तसंच व्यक्ती ओळखणे, गोष्टी लक्षात ठेवणे, सामान्य ज्ञान, गणितासंबंधित ज्ञान ही या रोबोटची वैशिष्ट्यं आहेत. तसंच शालू रोबोट लोकांना अभिवादन करु शकेल, भावना प्रकट करु शकेल, वर्तमानपत्र वाचू शकेल, रेसिपी लक्षात ठेवू शकेल आणि इतर बऱ्याच गोष्टी अगदी सहज करु शकेल, असंही ते म्हणाले.

पहा व्हिडिओ:

(हे ही वाचा: Air Purifier Robot: कानपूर येथील शालेय विद्यार्थ्याने विकसित केला हवा शुद्ध करणारा अनोखा रोबोट; 'ही' आहे खासियत)

शाळांमध्ये शिक्षक आणि कार्यालयांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून देखील याचा वापर केला जाऊ शकतो. तसंच कार्यालयीन काम आणि दैनंदिन कामकाजासाठी शालू रोबोट एक आदर्श साथीदार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.