गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये प्रदुषणाची समस्या अधिक गंभीर झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, कानपूर (Kanpur) येथील इयत्ता 11 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एक अनोखा रोबोट विकसित केला आहे. हा रोबोट हवेतील प्रदुषके (Pollutants) शोषून घेतो. प्रांजल (Pranjal) असे असून त्याने आपला वर्गमित्र आरेंद्र (Aarendra) याच्यासह एअर प्युरिफायर रोबोट (Air Purifier Robot) विकसित केला आहे. या रोबोटमध्ये एअर प्युरिफायर मशिन (Air Purifier Machine) इंस्टॉल केलेली आहे.
प्रांजलने एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वायु प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे मी हवा शुद्ध करणारा रोबोट तयार करण्याचा विचार केला. हा रोबोट हवेतील प्रदुषकं शोषून घेऊन पर्यावरणातच हवेचे शुद्धीकरण करतो. यासाठी रोबोटमध्ये प्युरिफायर बसवण्यात आलं आहे. हा रोबोट हवेतील प्रदुषक शोषून घेऊन शुद्ध हवा बाहेर सोडतं आणि प्रदूषित कण फिल्टरमध्ये अडकून राहतात, असेही त्याने सांगितले.
आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा अवस्थी यांच्यासमोर प्रांजलने या रोबोटचे प्रात्यक्षिक सादर केले. प्राजंलची कामगिरी पाहुन त्या थक्क झाल्या. प्रांजल हा आमचा भविष्यातील शास्त्रज्ञ आहे. तो शाळेतील लॅबमध्ये देखील मोठी मदत करतो. मला प्रांजल आणि त्याने विकसित केलेला रोबोट दोघांचाही अभिमान आहे. वायु प्रदूषण ही सध्याच्या घडीची मोठी समस्या आहे आणि त्यामुळेच त्याची ही निर्मिती नक्कीच महत्त्वपूर्ण आहे, असे पूजा अवस्थी यांनी सांगितले. (अहमदाबाद येथील 6 वर्षीय Arham Om Talsania ची मोठी कामगिरी; सर्वात लहान कॅम्प्युटर प्रोग्रामर म्हणून Guinness World Record मध्ये नोंद)
मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत प्रदुषणाची समस्या वाढली आहे. त्याचबरोबर वायु प्रदुषणाचा मोठा प्रश्न अनेक शहरांसमोर आहे. अशातच कोविड-19 चे संकट असल्याने देशावर घोंगावत आहे. मात्र प्रदुषणामुळे संसर्ग अधिक वाढू नये म्हणून दिवाळीतही फटाके न फोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.