Viral Video: माकडाच्या हाती फुगा, त्याने मारल्या हवेत उड्या; पाहा व्हिडिओ
Monkey Funny Video (Pic Credit - - Twitter)

सोशल मीडयावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक माकड फुगा घेऊन हवेत झेपावते आहे. आगोदरच माकड त्यात त्याला भेटला फुगा. तुम्ही कल्पना करा पुढे काय घडले असेल. माकडाचा हा मजेदार व्हिडिओ (Monkey Funny Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओखाली भलत्याच भारी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या माकडाचा फुग्यासोबत खेळण्याचा अंदाजही काही औरच आहे. कदाचीत हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपले बालपण आठवू शकेल.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एक माकड हातात फुगा घेऊन खेळत आहे. हा फुगाही भलताच मोठा आहे. जो माकडाच्या हातात येत नाही. परंतू, तरीही हा फुगा पकडण्याचा प्रयत्न करत माकड मजा करते आहे. माकड फुग्यावरही बसताना दिसते. तर कधी फुगा घेऊन झाडावर चढताना. त्याच्या या मजा सुरु असताना फुगा अचानक फुटतो. त्यानंतर माकडाची जी आवस्था होते ती पाहण्यासारखी आहे. (हेही वाचा, Monkey Viral Video: तुम्ही कधी कपडे धुणारा माकड बघितला आहे का? पाहा गंमतीदार व्हिडिओ)

हा व्हिडिओ पाहायला इतका मजेदार आहे की, अनेकांना आवडला आहे. काहींनी तो सोशल मीडियावर शेअरही केला आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी एक कॅप्शनही लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुलांना फुग्यांपासून कोणीही दूर करु शकत नाही. लोक व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक्स करत आहेत. एका युजरने या व्हिडिओबद्दल लिहिले आहे की, लहानपणी आम्ही फुग्यांसोबत असेच खेळत असू. दुसऱ्याने म्हटले आहे की, हा फुगा थोडासा मोठा आहे.