Monkey Viral Video: तुम्ही कधी कपडे धुणारा माकड बघितला आहे का? पाहा गंमतीदार व्हिडिओ
फोटो सौजन्य - Unsplash

सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, जनावरांच्या गंमतीशीर व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जाते. यातच सोशल मीडियावर एका माकडाचा गंमतीदार व्हिडिओ (Monkey Viral Video) समोर आला आहे. या व्हिडिओत माकड चक्क कपडे धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावणार आहेत. कारण, हा माकड कपडे धुताना हुबेहूब माणसांची नकल करत आहे. माणसांप्रमाणे कपड्यांना ब्रश लावणे. याव्यतिरिक्त दगडावर कपडे रगडणे यांसारख्या गोष्टी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 96 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. अनेकजण या गंमतीदार व्हिडिओचा आनंद घेत आहेत. बऱ्याच लोकांनी या व्हिडिओ कंमेंट देखील केल्या आहेत. दरम्यान, काही जण म्हणतात की, जनवारांकडून काम करून घेणे म्हणजे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखे आहेत. तर, काहीजण म्हणाले की, या माकडाने माणसांना कपडे धुताना पाहिले असेल. त्याचीच हा नक्कल करत असेल. माकड एक हुशार प्राणी आहे, ते नेहमी आपल्याला पाहून अनेक मानवी क्रिया शिकत असतात. हे देखील वाचा- Fact Check: पाऊस आणि बदलणाऱ्या वातावरणामुळे कोविड-19 चा संसर्ग कमी होईल? PIB ने सांगितले सत्य

व्हिडिओ-

याआधी सोशल मीडिया एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ एक माकड आपल्या मालकाच्या सांगण्यानुसार भाजी कापताना दिसला. या व्हिडिओतील महिलेचा चेहरा दिसला नाही. परंतु, या व्हिडिओतील माकडाला भाजी कापण्याची चांगली ट्रेनिंग दिली गेल्याचे दिसत होते.