Fact Check on COVID-19 Spread (Photo Credits: PIB)

सध्या देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) कहर अनुभवायला मिळत आहे. या कठीण काळात फेक न्यूज (Fake News), चुकीची माहिती वेगाने पसरत आहे. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या बातम्या पसरत असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत आहे. यात अजून एक मेसेजची भर पडली आहे. नव्याने व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये पाऊस (Rainfall) आणि बदलणाऱ्या वातावरणामुळे (Change in Weather Conditions) कोविड-19 (Covid-19) संसर्गाला आळा बसेल, असे म्हटले आहे. हा चुकीचा दावा व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पसरवला जात आहे.

प्रेस इनफार्मेशन ब्यूरोने (Press Information Bureau) या फेक न्यूज मागील सत्याचा उलघडा केला आहे. हा दावा पूर्णपणे निराधार आणि चुकीचा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. याबाबतचे स्पष्टीकरण पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून दिले आहे. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले की, "कोरोनाचा संसर्ग केवळ नियमांचे पालन केल्यानेच कमी होऊ शकतो. मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे." (Fact Check: ऑक्सिजनची कमतरता असल्यास होम्योपॅथिक औषध 'Carbo vegetabilis' येईल कामी? जाणून घ्या व्हायरस मेसेज मागील सत्य)

Fact Check By PIB:

कोविड-19 संकटात अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांना उधाण आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील तथ्य जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसंच कोरोनाचा संसर्ग झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.