Manuscript is in Hebrew and not exvacated from Ram Janabhoomi (Photo Credits: Twitter)

अयोद्धेमध्ये सध्या राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीचं काम जसं वेगाने सुरू झालं आहे तशी या रामजन्मभूमी बाबत अनेक उलट सुलट चर्चा, वाद विवाद देखील समोर येत आहेत. सध्या सोशल मीडीयात या ठिकाणी झालेल्या खोदकामामध्ये संस्कृत मध्ये लिहलेले हस्तलिखित आढळल्याची चर्चा आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की हे संस्कृत भाषेतील हस्तलिखित तांब्यावर कोरलेले असून ते राम मंदिराशी निगडीत आहे. दरम्यान हे हस्त लिखित जेथे सापडले ती जमीन देखील राम जन्म भूमीशी संबंधित आहे.

दरम्यान हे हस्त लिखित रामजन्मभूमी, र्राम मंदिराशी निगडीत असल्याचा दावा खोटा आणि तथ्यहीन, दिशाभूल करणारा आहे. इंडिया टुडे च्या रिपोर्ट नुसार, सापडलेले हे हस्तलिखित हिब्रु भाषेतील आहे. तसेच ते राम जन्मभूमी वरून सापडलेले नाही. मीडीया हाऊसच्या माहितीनुसार, "define.avcilari" या इंस्टाग्राम अकाऊंट वर हा व्हिडिओ 10 एप्रिल 2020 मध्ये पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला होता. मात्र या पेजवर या हस्तलिखिताबद्दल, व्हिडीओ बद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. या पेजची बायो देखील टर्किश भाषेत आहे.(नक्की वाचा: Ayodhya Ram Temple: राम मंदिर बांधण्यासाठी 'अशोक वाटिका'मधील शिळेचा होणार उपयोग; श्रीलंकेवरून आणला जात आहे दगड).

दिशाभूल करणारा व्हिडीओ

Oxford Interfaith Forum कडूनही देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हस्तलिखिताची भाषा हिब्रु आहे. त्याची स्टाईल पाहता ती आधुनिक असल्याचा तज्ञांचा दावा आहे. दरम्यान रामजन्मभूमीच्या उत्खननाचे काम 11 मे 2020 ला सुरू झाले आहे. तर व्हिडिओ महिनाभर आधी पोस्ट केलेला आहे.

मूळ व्हिडिओ

मागील काही दिवसांत राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावे खोटी वेबसाईट बनवून काही लोकांनी नागरिकांना लूबाडल्याची देखील घटना ताजी आहे. यामध्ये करोडो रूपये गोळा करून 500 जणांना लुबाडले आहे तर 5 जणांना बेड्या देखील ठोकण्यात आल्या आहेत.