तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील निलगीरी जिल्ह्यात (Nilgiris District) बिबट्याने केलेल्या हल्लात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे बिबट्या दबक्या पावलांनी थेट घरात आला. त्याने घरातील लोकांवर हल्ला केला. यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. ही घटना कन्नूर (Coonoor) येथील ब्रुकलँड (Brookland) परिसरात घडली. बिबट्याचा हल्ला होत असताना केलेल्या बचावात्मक कृतीमध्ये हे सर्वजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बिबट्या घरात शिरत असल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्या घरामध्ये प्रवेश करत असताना स्पष्ट दिसत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बिबट्या पाळीव कुत्र्याचा पाटलाग करत होता. बिबट्यापासून स्वत:चा बचाव करताना बिबट्या घरात घुसला. त्यापाठोबाठ बिबट्याही घरात घुसला. जे घर ब्रुकलँड परिसरात होते. दरम्यान, बिबट्या घरात घुसल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी कुन्नूर वनविभाग आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहोचेपर्यंत बिबट्याने घरातील लोकांवर हल्ला केला. ज्यामध्ये सहा जण जखमी झाले. घटनेचे वार्तांकन करण्याच्या उद्देशाने पोहोचलेल्या पत्रकारावरही बिबट्याने हल्ला केला, असे या वृत्तात वनविभागाच्या हावाल्याने म्हटले आहे.
व्हिडिओ
#WATCH | Tamil Nadu: A leopard entered a house in the Coonoor's Brooklands area, in Nilgiri, yesterday morning and attacked 6 people. The leopard stayed for more than 15 hours inside the house and escaped late on Sunday. https://t.co/LiQq4fk599 pic.twitter.com/4x5REMaKv6
— ANI (@ANI) November 13, 2023
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना जवळच्या कोन्नूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरातीललोकांवर हल्ला केल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, बिबट्या बराच वेळ घरातच आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक सक्रीय झाले. त्यांनी सापळा लावून बिबट्याला पकडले. नीलगिरीच्या कुन्नूर परिसरातील महापालिका हद्दीत बिबट्यांचा वावर असलेल्या अनेक घटा पुढे आल्या आहेत. अलिकडील काही काळात या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही पाहायला मिळाले आहे.
व्हिडिओ
#WATCH | Tamil Nadu: A leopard entered a house in the Coonoor's Brooklands area, in Nilgiri. pic.twitter.com/bPbh7tW91F
— ANI (@ANI) November 13, 2023
बिबट्या हा मध्य आशिया भारत, चीन, म्यानमार अशा प्रदेशांमध्ये आढळणारा मार्जर कुळाती प्राणी आहे. जो मांसाराही आहे आणि तो झाडावर चढू आणि उतरु शकतो. बिबट्या हा त्याच्या काळ्या गडद-हलक्या आणि पठ्ठापठ्यांच्या रंगामुळे सहज ओळखून येतो. त्याचे डोळेही विशिष्ट बद्धतीचे असतात. त्याला ब्लँक पँथर म्हणूनही ओळखले जाते. हा प्राणी गवत आणि झाडांमधून आढळतो. बिबट्याचा आकार आणि खुणा यात खूप फरक असतो. त्याचा सरासरी आकार वजन 50 ते 90 किलो (110 ते 200 पाउंड) , शेपपटीसह त्याची लांबी 210 सेमी (84 इंच), 90-सेमी इतकी असते. तर, शेपूट वगळता, लांबी आणि 60 ते 70 सेमीअसते.