Labrador Picks Up Sex Toy: 'सेक्स टॉय' तोंडात पकडून पळाला कुत्रा; तिची झाली दैना.. दैना
Labrador | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

आमचा कुत्रा उर्फ टॉमी, टॉम्या हा किती छान... किती अज्ञाधारक याचे 'श्वान पुराण' ऐकवून अनेक श्वानमालक समोरच्याच्या कानाला फेस आणतात. समोरचा वैतागलेला असला तरीही यांचे 'श्वान पुराण' काही संपता संपत नाही. पण असे श्वान कधीकधी मालकावर अशी काही वेळ आणतात की मालकाची केवळ बोलतीच बंद होत नाही तर त्याला लाजल्यासाहखेही होते. अशाच एका कुत्र्याने एका महिलेची अवस्था केली. क्लारा रॉबसन (Klara Robson) असे या महिलेचे नाव आहे. क्लारा रॉबसन ही इतरांचे कुत्रे फिरवण्याचे काम व्यावसायिकपणे करते.  गुरुवारी (1 सप्टेंबर) ती एका  Labrador कुत्र्याला घेऊन चार्लाई (Charlie ) येथे  गेली होती. दरम्यान, त्या कुत्र्याच्या मालकाचा तिला मेसेज आला की, त्याचा कुत्रा कसा आहे. यावर क्लारा हिने कुत्र्याच्या मालकाला कुत्र्याचा फोटो पाठवला. पाठवलेला फोटो पाहून तिच्या लक्षात आले की, तिचा कुत्रा त्याला सापडलेला सेक्स टॉय (Sex Toy) उचलून तोंडात पकडून धावत होता. त्याच्यासोबत खेळत होता.

दरम्यान, आपल्या Labrador कुत्र्याचा प्रताप तिच्या ध्यानात येताच ती कुत्र्याच्या पाठी धावू लागली. जेणेकरुन त्याने तोंडात पकडलेला सेक्स टॉईज टाकून द्यावा. सोबत क्लारा रॉबसन हिला दुसरीही एक काळजी सतावत होती. सेक्स टॉईज हरवलेला पाहून सेक्स टॉईजचा मालक भलताच चिंतेत असेल. त्याचा टॉईज आपल्या कुत्र्याने पळवला हे जर त्याला कळले तर? या भीतीने क्लारा रॉबसन तिच्या कुत्र्याला विनवणी करत होती की, त्याने सेक्स टॉय तिथेच फेकावा. ती त्या कुत्र्याला लाथाही मारु लागली परंतू, तो आपल्या खेळात इतका मश्गूल होता की, तोंडातले खेळणे टाकूण द्यायचा तो अजिबात विचार करत नव्हता. (हेही वाचा, बेळगाव: कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी बायकोवर दबाव; विकृत नवऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास)

सुरुवातीला क्लारा रॉबसन हिला कळेच नाही की, आपला कुत्रा कशाशी खेळतो आहे. नंतर तिने निरखून पाहिले की, तो सेक्स टॉय आहे. तेव्हा मात्र तिला फारच ओशाळल्यासारखे झाले. शेवटी एक 33 वर्षीय व्यक्ती तिच्या मदतीला आला. त्याने कुत्र्याचे लक्ष विचलीत केले. सेक्स टॉय कुत्र्यापासून सोडविण्यात त्यांना यश आले. हा सगळा प्रकार जवळपास 15 मिनीटे चालला होता. दरम्यान, एका व्यक्तीने क्लारा हिस सांगितले की, तिचा कुत्रा टेकडीवरुन सेक्स टॉय घेऊन पळाला. द सन डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी)

वरच्या घटेनत काही विशेष घडले नाही. कुत्र्याकडून नकळतपणे ही घटना घडली. परंतू, कुत्र्याच्या मालकीणीची मात्र घडल्या प्रसंगामुळे चांगलीच दैना उडाली. दरम्यान, क्लारा हिने ही घटना आपल्या फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफार्मवर शेअर केली आणि मग तिच्यावर युजर्सच्या कमेंट आणि मिम्सचा पाऊस पडू लागला.