बेळगाव: कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी बायकोवर दबाव; विकृत नवऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास
प्रातिनिधिक, प्रतिकात्मक आणि संपादित प्रतिमा ( (Photo Credit: File Photo))

Man Forced Wife To Sex With Dog: कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे एका विकृत नवऱ्याला स्थानिक न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा विकृत नवरा (Distorted Husband) मोबाईलवर अश्लील चित्रफीती (Mobile Porn Video) पाहात असे. तसेच, चित्रफीतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अनैसर्गिक शरीरसंबंध (Unnatural Sex) करण्यासाठी बायकोवर दबाव टाकत असे. नवऱ्याची विकृती इतक्या टोकाला गेली की, त्याने आपल्या पत्नीसोबत केवळ अप्राकृतीक शरीरसंबंधच केला नाही तर, कुत्र्यासोबत सेक्स (Sex with Dog) करण्यासाठीही बायकोवर दबाव टाकला.

नवऱ्याच्या विकृतीला पत्नीने विरोध केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर सततचा अप्राकृतीक शरीरसंबंध, कुत्र्यासोबत संभोग करण्यासाठी सातत्याने टाकलेला दबाव आणि इतर लैंगिक, मानसिक छळ आदींना कंटाळून पीडित पत्नीने पती विरोधात तक्रार केली. या प्रकरणात जिल्हा सेशन कोर्टाने विकृत पतीला 10 वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली. हा गुन्हा अत्यांत गंभीर आहे असे मत नोंदवत 11 हजार रुपयांचा आर्थिक दंडही न्यायालयाने आरोपीला ठोठावला.

प्राप्त माहितीनुसार, पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीला मार्च 2017 मध्ये अटक केली होती. कताकोल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देत पत्नीने आरोप केला होता की, पती आपल्यासोबत अनैसर्गिक (अप्राकृतिक) शरीरसंबंध ठेवतो. तसेच, कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी दबाव टाकतो.

पतीला मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय होती. ही सवय व्यसनाईतकीच प्रबळ होती. तो रात्ररात्रभर मोबाईलवर पॉर्न पाहात असे. पॉर्न व्हिडिओ पाहून तो आपल्यासोबत प्रत्यक्षात तशा प्रकारचा सेक्स करण्याची इच्छा व्यक्त करत असे. त्यासाठी दबाव टाकत असे. विरोध केल्यास शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ करत असे, असे पीडित पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, जर कुत्र्यासोबत सेक्स करण्यास तयार झाली नाही तर घरात राहायचे नाही, अशा पद्धतीने पती आपणास ब्लॅकमेलही करत असे. 22 मार्च 2017 रोजी रात्री 10.30 वाजनेच्या सुमारास पती एक कुत्रा घेऊन घरात आला. त्याने आपल्याला कुत्र्यासोबत सेक्स करण्यास सांगितले. कुत्र्यासोबत सेक्स नाही केला तर, घरातून बाहेर व्हावे लागेल अशी धमकीही त्याने आपल्याला दिल्याचे पत्नीने म्हटले आहे. अखेर 25 मार्च 2017 रोजी पत्नीने विकृत प्रवृत्तीच्या आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.