Jyotiraditya Scindia Dancing: ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दमदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
Jyotiraditya Scindia | (File Image)

Jyotiraditya Scindia Dance Video: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हटके डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंधिया स्कूलच्या 125व्या स्थापना दिनानिमित्त (Scindia School 125th Foundation Day) आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमावेळी काही कलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर केला. या वेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. खरे तर सिंधिया यांचा डान्स पाहून ते चांगले डान्सर असावेत किंवा कदाचित त्यांनी डान्सचे शिक्षणही घेतले असावे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. सोशल मीडियावर तर त्यांच्या डान्सचे चांगलेच कौतुक होत आहे. या निमित्ताने त्यांच्याती आणकी एका कलाविष्काराचा नवा पैलू त्यांच्या चाहते आणि हितचिंतकांसमोर आला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिमध्ये पाहायला मिळते की, ज्योतिरादित्य सिंधिया हे केवळ नाचायचे म्हणून नाचत नाहीत. तर त्यांना ठेका कळतो आणि संगिताच्या ठेक्यावरच त्यांची पावले पडतात असेही पाहायला मिळाले. त्यांचा डान्स पाहून सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका राजकारण्याकडे कलेच्या बाबतीत असलेले हे गुण पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याचेही पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. त्यामुळे हे शहरही मोठ्या प्रमाणावर रोशनाई करुन सजविण्यात आले होते. तसेच, शहरातील नागरिांनी पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहात स्वागतही केले.

व्हिडिओ

ज्योतिरादित्य सिंधिया हे एक भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे वडील माधवराव सिंधिया हे प्रतिष्ठित राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2002 ते 2020 या काळात भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेत खासदार (एमपी) म्हणून काम केले. खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेस पक्ष आणि सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. दरम्यान त्यांनी 2020 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये सामील झाले. या निर्णयाचा मध्य प्रदेशच्या राजकीय परिदृश्यावर मोठा परिणाम झाला, जिथे भाजपने सिंधिया यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. दरम्यान,त्यांनी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

भाजपचे सदस्य म्हणून, सिंधिया यांनी पक्षाच्या नेतृत्वात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांची संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम करतात, त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक विभागाचा कार्यभार आहे.