टीव्ही शो दरम्यान स्त्री पुतळ्यावर करायला लावले बलात्काराचे प्रात्यक्षिक; होस्टवर निलंबनाची कारवाई
TV Host Yves de Mbella (Facebook/Yves de Mbella)

एका लाईव्ह शो (Live Show) दरम्यान बलात्काराचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास सांगणाऱ्या टीव्ही होस्टला (TV Host) निलंबित करण्यात आले आहे. आफ्रिका (Africa) खंडातील आयव्हरी कोस्ट (Ivory Coast) या देशामधून ही घटना समोर येत आहे. टीव्ही शो होस्ट Yves de Mbella याने एका बलात्कार आरोपीला स्त्री पुतळ्यावर बलात्काराचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास सांगितले. ही घटना आयव्हरी कोस्ट, पश्चिम आणि मध्य आफ्रिकेमध्ये प्रचंड व्हायरल झाली.  या घटनेनंतर एक ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात आली असून सुमारे 30 हजाराहून अधिक लोकांना टीव्ही होस्टला शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर चॅनलने सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

टीव्ही होस्टने एका स्त्री पुतळ्यासोबत बलात्कारी आरोपीला प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले आणि त्याने त्यासाठी आरोपीची मदत देखील केली. इतकंच नाही तर बलात्कार करण्यासाठी महिलेची कशी निवड करतो, असा प्रश्न देखील विचारला. हा शो सोमवारी राष्ट्रीय चॅनलवर प्रसारित झाला. त्यानंतर शो मधील हा सेगमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर देशाचे स्वतंत्र कम्युनिकेश कॉन्सिल यांनी होस्टला 30 दिवसासाठी निलंबित केले आणि अशाप्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही, अशी तंबीही दिली. (Rape Post Explaining Procedure Goes Viral: महिलेवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार कसा करावा? हे सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; पोलीस तपास सुरु)

या सर्व घटनेनंतर होस्ट Yves de Mbella याने फेसबुक पोस्टद्वारे माफी मागितली आहे. बलात्कारासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशातून हे करण्यात आले असून त्यामुळे दुखावल्या गेलेल्या माझ्या सर्व प्रेक्षकांची मी माफी मागतो, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. येत्या शुक्रवारी या शो चा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होणार होता. परंतु, चॅनलने हा शो आता रद्द केला आहे.