अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एका आयआयटी च्या विद्यार्थ्याने आपले पॅशन पूर्ण करत आहे. किशोर इंदुकुरी (Kishore Indukuri) असं या तरुणाचं नाव असून तो भारतातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला. त्याने आयआयटी खडगपूर (IIT Kharagpur) मधून डिग्री घेत आपले मास्टर्स ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला उत्तम पगाराची नोकरी मिळाली. मात्र सहा वर्ष नोकरी केल्यानंतर शेतीप्रती असलेली ओढ जाणवू लागली आणि त्याने त्यासंबंधित व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
कर्नाटक मध्ये त्याच्या कुटुंबियांची शेती आहे. त्यामुळे शेतीविषयिक माहिती उपलब्ध होणे, शेतीत फिरणे याची मुभा सहजच मिळाली. 2012 मध्ये किशोर अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात परतला. हेद्राबाद येथे राहून त्यांनी दूधावर रिसर्च केला. त्यावेळेस शहरात सुरक्षित दूधासाठी ठराविक पर्याय असलेल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून केवळ माझ्या परिवारासाठी नाही तर हैद्राबादमधील लोकांसाठी बदल गरजेचा असल्याचे जाणवून लागले. त्यातूनच डेअरी ब्रँड सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी कोयंबटूर मधून 20 गायी खरेदी केल्या.
सब्सक्रिप्शनच्या आधारावर त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आणि काळानुसार ग्राहकांमध्ये वाढ होत गेली. 2016 मध्येत्यांनी सिड्स फार्म नावाने आपल्या व्यवसायाचे अधिकृत रजिस्ट्रेशन केले. आज त्याचे 10,000 हून अधिक ग्राहक आहेत. त्याच्याकडे 120 हून अधिक कर्मचारी काम करत असून मागील वर्षी यातून एकूण 44 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
दरम्यान, सुरुवातीचे काही दिवस खडतर गेल्यानंतर आता दिवसेंदिवस ब्रँडचे यश वाढत आहे. एक कोटी रुपयांच्या गुंतवणूकीत हा व्यवसाय सुरु करण्यात आला होता. हे सगळे सोपे नव्हते. सर्व काही नवीन होते आणि या सगळ्याशी लवकरात लवकर ओळख करुन घेण्याचा माझा मानस होता. सुरुवातीला 20 गायींसोबत आम्ही दूध विक्रीला सुरुवात केली.
व्यवसाय सुरु करता सर्व बचत गुंतवली. तसंच कुटुंबियांकडून देखील काही पैसे घेतले. त्यांनी देखील विश्वास दाखवला. सुरुवातील केवळ गायीच्या दूधाची विक्री केली जात होती. त्यानंतर आता म्हशीचे दूध, तूप, लोणी, दही या पदार्थांची देखील विक्री होत आहे. विशेष म्हणजे कोविड-19 संकटात देखील त्यांची दूधाची मागणी आणि पुरवठा कमी झालेली नाही.