स्टॅच्यू ऑफ युनिटी (Photo Credit- PTI)

Statue of Unity हा सरदार वल्लभभाई पटेलांचा (Sardar Vallabhbhai Patel) पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे. सुमारे 182 मीटर उंचीचा हा पुतळा अवकाशातून कसा दिसतो याचं एक विहंगम दृश्य टिपण्यात आलं आहे. ट्विटरवर Oblique SkySat ने टिपलेले एक छायाचित्र शेअर करण्यात आलं आहे. सोशल मीडियामध्ये या फोटोला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. हा फोटो 15 नोव्हेंबर 2018 ला टिपण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी : सरदार पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा तयार ; ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये

सरदार वल्लभभाई पटेल(Sardar Vallabhbhai Patel)  हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. भारताला एकसंध बांधण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर जगातील सर्वात उंच पुतळ्याची उभारणी झाली आहे. गुजरातमध्ये पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल आणि रोजगार निर्मिती होईल असा सरकारचा विश्वास आहे. या पुतळ्याला पाहण्यासाठी पर्यटकांनीही रेकॉर्डब्रेड गर्दी केली आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देण्यासाठी कसे पोहचाल आणि काय आहेत तिकीट दर ?

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel)  यांची 31 ऑक्टोबर 2018 रोजी 143 वी जयंती असल्याने त्याचे औचित्य साधत या स्मारकाचे अनावरण करण्यात आले.