Viral Video: लुंगीचा 'असा' वापर तुम्ही कधी केला आहात का? व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
Use of Lungi (Photo Credits: Twitter)

लुंगीचा वापर सर्वसामान्यपणे लोक एक पेहराव म्हणून घालतात. अंग झाकण्यासाठी लुंगीचा वापर आपण करतो असेही आपण बोलू शकतो. मात्र सोशल मिडियावर एका इसमाने लुंगीचा (Lungi) वापर एका वेगळ्याच कारणासाठी केला आहे. त्याने अशा काही अंतरंगी पद्धतीने लुंगीचा वापर केला आहे जे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदाने ट्विटरवर हा व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे. या व्हिडिओखाली 'लुंगीचे नानाविध उपयोग आहेत' असे कॅप्शन दिले आहे.

तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला कळेल हा व्यक्ती लुंगीचा उपयोग साप पकडण्यासाठी करत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ आईएफएस सुशांत नंदाने 14 मे ला शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत 15k व्ह्यूज मिळाले आहेत.हेदेखील वाचा- Python Eats Alligator Video: अवघ्या काही मिनिटातच अजगराने एलीगेटरला गिळून टाकले; व्हिडिओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम

या व्हिडिओला 229 रीट्विट मिळाले आहेत. तर 1628 लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओला लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने तर 'लुंगीमध्ये पुंगी' तर एकाने 'अद्भूत भारत' असे लिहिले आहे.

या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती लुंगी घालून उभा आहे आणि एका विषारी सापासोबत खेळत आहे. तो व्यक्ती आपल्या हातात हा साप घेऊन उभा आहे. सापावर नियंत्रण मिळवण्याचा तो व्यक्ती प्रयत्न करत आहे. तर सापही त्याला टशन देत आहे. त्यानंतर तो व्यक्ती आपली लुंगी खोलून त्यामध्ये सापाला घेऊन ती लुंगी आपल्या कमरेला बांधत आहे. तो व्यक्ती तशीच ती लुंगी घालून तिकडून निघून जातो.