Python Eats Alligator Video: अवघ्या काही मिनिटातच अजगराने एलीगेटरला गिळून टाकले; व्हिडिओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Photo Credit: Youtube

अजगर विषारी नसतात, परंतु ते विषारी सापांपेक्षा अधिक धोकादायक असतात कारण ते त्यांच्या शिकाराला आपल्या जाळ्यात घट्ट अडकवतात आणि त्यांना ठार मारुन गिळुन टाकतात. एकदा काय अजगराने एखाद्याला विळखा घातला की त्यातून सूटने कठीण असते.अजगर सापांपेक्षा भारी आणि चपळ असतात, म्हणून निसर्गाने त्यांना शिकार मारण्याची आणि गिळण्याची क्षमता दिली आहे.एलीगेटर गिळून टाकणारा राक्षस अजगरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे खुप भयंकर आहे. (समुद्रामध्ये प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये अडकून तडफडणार्‍या माशाला एका स्कुबा डायवरने दिले जीवनदान; पहा हा हृद्यस्पर्शी व्हिडीओ (Watch Viral Video)

Ojatro नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यामध्ये एक प्रचंड मोठा अजगर मोठ्या एलीगेटर अगदी सहज गिळताना दिसतो. हा व्हिडिओ पाहणार्‍या कोणालाही हे पाहुन आश्चर्य वाटेल.व्हिडिओमध्ये दिसणारा अजगर खूप जाड आणि उंच आहे, म्हणूनच तो खूप शक्तिशाली आहे,एलीगेटर पण त्यापेक्षा कमी शक्तिशाली नाही, परंतु बर्‍याच वेळानंतर त्या दोघांमध्ये झालेल्या झटपटित अजगराचा विजय होतो. अजगर इतक्या मोठ्या एलीगेटला सहज कसे गिळतो हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

बहुतेक अजगर झाडांवर राहतात. ते पाण्यात, चिखलात किंवा कोरड्या पाण्याखाली लपून बसतात आणि आपल्या शिकारीची वाट पाहतात. शिकार जवळ येताच ते त्यांच्यावर उडी मारतात आणि गळा आवळून त्यांना गिळून टाकतात. आतापर्यंत 14 कोटी 84 लाख 87 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अजगर आणि सापांशी संबंधित व्हिडिओ बर्‍याचदा YouTube चॅनेलवर शेअर केले जातात.