Fact Check Tom Hanks Arrested (Photo Credits: Twitter)

सोशल मीडिया (Social Media) हे मुळात संभाषणाचे, संवादाचे माध्यम आहे. सोशल माडियामुळे दूर राहणारे नातेवाईक, संपर्कात नसणारी मित्रमंडळी या सगळ्यांना बांधून ठेवता आले आहे. एवढेच नव्हेतर, सोशल मीडिया माध्यमातून जगभरात काय घडले आहे? याची काही सेकंदाच आपल्याला माहिती मिळते. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सगळ्याच बातम्या खऱ्या असतात, असे नाही. त्यातील काही बातम्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पेरल्या जातात. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशाच एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बातमीत अमेरिकन अभिनेता टॉम हॅन्क्स (Tom Hanks) यांना चाईल्ड पोर्नोग्राफीच्या (Child Pornography) आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, ही बातमी तथ्थहीन असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

टॉम हॅंक्सच्या अटेकबाबत ट्विटरवर व्हायरल होत असलेली बातमी बीबीसी न्युजने पब्लीश केल्याचे दाखवले जात आहे. याचबरोबर टॉम हॅंक्सला 135 चाईल्ड पॉर्नग्राफीच्या नावाखाली अटक, अशीही हेडलाईन देण्यात आली आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. पंरतु, ही बातमी खोटी असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तसेच अशाप्रकारची कोणतीच बातमी आम्ही प्रसिद्ध केली नसल्याचे बीबीसीने म्हटले आहे. यामुळे या बातमीवर कोणीही विश्वास ठेवू नका. तसेच ही बातमी एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- IOCL त्यांच्या 40 व्या वर्षपूर्ती निमित्त Lucky Draw म्हणून मोबाईल फोन, टीव्ही फ्री गिफ्ट देत असल्याचे वायरल मेसेज खोटे; PIB Fact Check ने केला खुलासा

ट्वीट-

याआधीही 2020 मध्ये टॉम हॅंक्स यांना ऑस्ट्रेलियामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. एवढेच नव्हेतर, टॉम हॅंक्स हे तरूगांत असताना त्यांची कोरोना चाचणीदेखील पॉझिटिव्ह आल्याचे त्या बातमीत सांगितले होती. पंरतु, तपासानंतर ही माहिती देखील खोटी असल्याचे समोर आले होते.