कोरोना विषाणूने दुसऱ्या लाटेमध्ये भारतामध्ये मोठा हाहाकार माजवला होता. मोठ्या प्रयत्नांनी आता कुठे कोविडची दुसरे लाट मंदावली आहे, मात्र तिसऱ्या लाटेने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. ही तिसरी लाट टाळण्यासाठी सरकार आणि विविध एजन्सी लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचा सल्ला देत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही वेळोवेळी कोरोनाविरूद्ध सामाजिक अंतरासह इतर नियम व निर्बंध पाळण्याचे आवाहन करत असतात. याकाळात सोशल मिडियावर अनेक खोट्या, फेक बातम्या व्हायरल होत आहेत. आताही लॉकडाऊन संबंधी एक दावा व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचा आणि देशात पुन्हा लॉकडाउन लागू होणार असल्याचा दावा केला गेला आहे. या फोटोद्वारे लोकांची दिशाभूल करण्यासाठी इथे पंतप्रधान मोदींचे एक चित्र उद्धृत केले आहे. आता सरकारने हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगितले आहे.
एक #फर्जी तस्वीर में पीएम मोदी के हवाले से कोरोना की तीसरी लहर शुरु होने व लॉकडाउन लगाने का दावा किया गया है।#PIBFactCheck
▶️पीएम द्वारा ऐसा कोई ऐलान नहीं किया गया है।
▶️कृपया ऐसे भ्रामक संदेशों को साझा न करें।
▶️कोरोना से बचाव के लिए कोविड उपयुक्त व्यवहार अवश्य अपनाएँ। pic.twitter.com/Ls1UoibQRc
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 30, 2021
सरकारचे ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकच्या वतीने सांगितले आहे की, एका दिशाभूल करणाऱ्या फोटोमध्ये दावा केला आहे की देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, पंतप्रधानांनी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र हा दावा खोटा आहे. पंतप्रधानांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. कृपया असे खोटे संदेश शेअर करू नका.’ (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता देणार रोजगार)
दरम्यान, कोविड-19 मुळे बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणार्या आर्थिक मदतीसाठी किमान निकषांसाठी, नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एनडीएमए) दिले.