Fact Check: प्रधानमंत्री क्रेडिट योजने अंतर्गत महिलांना दिले जात आहेत 3 लाख रुपये? जाणून घ्या सत्य
Fake Post (Photo Credits: PIB)

कोविड-19 (Covid-19) संकटात फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) समवेत सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरुन अफवा पसरु लागल्या. सरकारी योजना, धोरणं याबाबत खोट्या बातम्या जोरदार व्हायरल होऊ लागल्या. यापैकी अनेक खोट्या बातम्यांमागील सत्याचा खुलासा पीआयबीने (PIB) केला आहे. आता यात अजून एका बातमीची भर पडली आहे. प्रधानमंत्री क्रेडिट योजने अंतर्गत महिलांना 3 लाख रुपये देण्यात येत असल्याचा दावा एका युट्युब व्हिडिओमधून करण्यात येत आहे. याचा खुलासा पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) केला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, "प्रधानमंत्री क्रेडिट योजने अंतर्गत महिलांना 3 लाख रुपये देण्याची कोणतीही योजना सुरु करण्यात आलेली नाही. युट्युब व्हिडिओत केला जाणारा दावा कोटा आहे." तसंच केंद्र सरकारकडून देखील अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Fact Check by PIB:

प्रधान मंत्री मुद्रा योजनेंतर्गत महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज दिले जात आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या मदतीने महिला ब्यूटी पार्लर, टेलरिंग, शिकवणी इत्यादी लहान व्यवसाय सुरू होऊ शकतात. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांना अर्ज दिल्यानंतर मुद्रा कार्ड दिले जाते. (Fact Check: कोविड-19 लस भारतात लॉन्च-रजिस्ट्रेशन सुरु? PIB ने केला व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेज मागील खुलासा)

खोट्या बातम्या, अफवा यांपासून सावध रहा, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील तथ्य तपासणी अवश्य करुन घ्या. त्यामुळे तुमच्यासोबत इतरांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल.