कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात फेक न्यूजचे (Fake News) पेव फुटले. दिवसागणित खोटी आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागल्या. यात आता अजून एका बातमीची भर पडली आहे. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याचे एका न्युज आर्टिकलमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या व्हायरल बातमी मागील सत्य सांगितले आहे.
तसंच 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याने ATM मध्ये केवळ 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्याचेही या बातमीत म्हटले आहे. दरम्यान, हा दावा खोटा असून आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केलेला नाही, असे पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे व्हायरल होणारी बातमी फेक असल्याचे सिद्ध झाले आहे. (Fact Check: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान न केल्यास मतदारांच्या बँक अकाऊंटमधून 350 रुपये कापले जाणार? PIB ने सांगितले सत्य)
न्युज आर्टिकलमधील दावा: RBI ने 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याने ATM मध्ये केवळ 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा काढता येतील.
पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा खोटा असून आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केलेला नाही.
Fact Check By PIB:
एक न्यूज़ आर्टिकल में दावा किया जा रहा है कि भारतीय रिजर्व बैंक ने 2000 रुपये के नोटों की आपूर्ति बंद कर दी है जिसके कारण एटीएम से केवल 100, 200 व 500 रूपए के नोट ही निकाले जा सकेंगे। #PIBFactcheck: यह दावा फर्जी है। @RBI ने ₹2000 के नोटों की आपूर्ति बन्द नहीं की है। pic.twitter.com/DzDMwXuRox
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 2, 2020
अशा प्रकारच्या फेक न्यूज नागरिकांची दिशाभूल करतात. तर अनेकदा फसवणूकही केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजेवर अंध विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारसह पीआयबी कडून करण्यात येते.