Fact Check: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान न केल्यास मतदारांच्या बँक अकाऊंटमधून 350 रुपये कापले जाणार? PIB ने सांगितले सत्य
PIB debunks fake news | (Photo Credits: Twitter/@PIBFactChec)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात फेक न्यूजचे (Fake News) पेव फुटले. या फेक न्यूजमधून अनेक प्रकारचे दिशाभूल करणारे दावे करण्यात आले होते. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेककडून (PIB Fact Check) वेळोवेळी फेक न्यूजमागील सत्याचा उलघडा करण्यात आला. अलिकडेच सोशल मीडियावर एक नवा मेसेज व्हायरल होत आहे. या न्यूज ऑार्टिकलमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये कापण्यात येतील, असा दावा करण्यात आला आहे. पीआयबीने या फेक न्यूजमागील सत्याचा उलघडा केला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत जे मतदार मतदान करणार नाहीत त्यांच्या अकाऊंटमधून निवडणुक आयोगाद्वारे 350 रुपये कट होतील, असा दावा या व्हायरल न्यूज आर्टिकलमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याचे खंडन करताना सांगितले की, हा दावा खोटा असून निवडणुक आयोगाकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. (Fact Check: 'जीवन लक्ष्य योजना' अंतर्गत केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात 7 लाख रुपये जमा करत आहे? यूट्यूबवर व्हायरल झालेल्या या बातमीमागील सत्य जाणून घ्या)

Fact Check By PIB:

यापूर्वी सोशल मीडियावर एका मेसेज जोरदार व्हायरल होत होता. त्यात पीएम मुद्रा योजने अंतर्गत लोन घेण्यासाठी लीगल चार्ज म्हणून 2,150 रुपये आकारण्यात येतील, असे म्हटले होते, तसंच व्हायरल होणारं पत्रक अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं होतं. हा दावा देखील खोटा असल्याचे पीआयबीने सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजला बळी न पडण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.