Fact Check: कोविड-19 लस रजिस्ट्रेशनसाठी CoWinHelp App ची होणार मदत? PIB ने केला Viral WhatsApp Message मागील खुलासा
Fake Message on COVID-19 Vaccination Registration (Photo Credits: PIB)

कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Pandemic) गंभीर काळात लसीकरणासाठी नागरिकांची केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. तत्पूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. याचाच फायदा घेत एक फेक मेसेज (Fake Message) व्हॉट्सअॅपद्वारे (WhatsApp) पसरवला जात आहे. या मेसेजमध्ये कोविड-19 लसीकरण रजिस्ट्रेशनसाठी कोविनहेल्प अॅपची (CoWinHelp App) लिंक दिली आहे. या लिंकवरुन अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. वेगाने पसरत असलेल्या या मेसेजमागील सत्याचा खुलासा पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) केला आहे. (Fact Check: कोविड-19 लसीचा अभिप्राय घेण्यासाठी येणाऱ्या फोनमुळे मोबाईल हॅक? PIB ने दिले स्पष्टीकरण)

पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, मेसेजमधील लिंक आणि अॅप फेक आहे. तसंच ट्विटमध्ये कोविन च्या अधिकृत वेबसाईटची लिंक दिली असून कोविड-19 लसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमंग आणि आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यास सांगितले आहे.

Fact Check By PIB:

अशाप्रकारचे अनेक फेक मेसेजेस सोशल मीडिया माध्यमातून पसरवून नागरिकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध रहा. दरम्यान, सरकारी योजना, पॉलिसी किंवा इतर फेक बातम्यांमागील सत्य उलघड्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक कार्यरत आहे. (Fact Check: लखनऊच्या सांडपाण्यात Covid-19 सापडला? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य)

कोविड लस रजिस्ट्रेशनसाठी CoWIN (ww.cowin.gov.in) हे अधिकृत सरकारी पोर्टल उपलब्ध आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. डॉक्टर्स, आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्सनंतर 60 वर्षांवरील व्यक्ती त्यानंतर 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झाले. सध्या 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु आहे.